वडवणी रिपोर्टर
डोंगरेवाडी येथील रहिवासी असणारे हनुमंत डोंगरे हे काही कामानिमित्त वडवणी येथे गेले होते वडवणी येथून हनुमंत डोंगरे हे त्यांच्या सासर्यासोबत डोंगरेवाडी येथे आपल्या गावी जात असताना चिंचवण फाटा येथे चिकन घेण्यासाठी थांबले होते डोंगरे यांनी चिकनच्या दुकानासमोर आपली मोटरसायकल लावली होती.यावेळी सोन्ना खोटा येथील रहिवासी असणारे शिवराम खोटे आणि रमेश खोटे यांनी आपली चार चाकी गाडी ही फिर्यादी हनुमंत डोंगरे यांच्या दुचाकीच्या बाजूला आडवी उभा केली होती.
डोंगरे यांनी खोटे यांना चार चाकी गाडी बाजूला घ्या मला मोटरसायकल काडायची आहे असे म्हणतात खोटे यांनी काहीही न बोलता बाजूला पडलेल्या लोखंडी गज घेऊन फिर्यादी डोंगरे यांच्या डोक्यात डाव्या हाताच्या अंगठ्यावर मारहाण करून गंभीर जखमी केले तसेच रमेश खोटे यांनी देखील. फिर्यादीस लाथा बुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली.
फिर्यादी डोंगरे यांच्या डोक्यात गंभीर जखम झाली असून डाव्या हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाला असल्याने हनुमंत डोंगरे यांच्या फिर्यादीवरून शिवराम खोटे व रमेश खोटे यांच्याविरुद्ध वडवणी पोलीस ठाण्यात कलम 118(2), 115(2), 352 (2)351(3), 3(5) बीएनएस नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास हे वडवणी पोलीस ठाण्याचे पोह केदार हे करत आहेत.