केज (रिपोर्टर):- अंबाजोगाईकडून भरधाव वेगात आलेल्या कंटनेरच्या चालकाचा ताबा सुटल्याने केज येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या गेटजवळील संरक्षण भिंतीला जाऊन धडकला. हा अपघात 16 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला.

अंबाजोगाई कडून केजकडे भरधाव वेगात येत असलेल्या कंटेनरच्या (एन. एल. 01 एएच 4508) चालकाचा येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर ताबा सुटल्याने कंटनेर रुग्णालयाच्या भिंतीला जाऊन धडकला. या अपघातात जखमी झालेल्या चालक सिद्धेश्वर घन:शाम घुले याला लोकांनी तातडीने बाहेर काढून त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार केले. सुदैवाने गेटवर रुग्ण आणि नातेवाईकांची वर्दळ नसल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीचे व कंटनेरचे नुकसान झाले आहे.