लेखापरीक्षकासह 24 जणांवर गुन्हा

माजलगाव (रिपोर्टर): संस्थेत जमा झालेल्या ठेवीच्या नोंदी व कर्ज रकमेच्या नोंदी संगणकावर न करता बनावट दस्तऐवज करून ठेवीदारांना ठेऊन पावत्या व कर्जदारांना बेबाकी प्रमाणपत्र दिल्या. या प्रकरणी मराठवाडा अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचे संचालक मंडळ व कर्मचारी, धनदांडगे मालमत्ता खरीददार व या सोसायटीच्या लेखापरीक्षकासह 24 जणांवर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात लेखापरीक्षा वर्ग 2 त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोसायटीचे फेर लेखापरीक्षण केले
माजलगाव शहरातील मोंढा भागात असलेल्या मराठवाडा अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2023 चे फेर लेखापरीक्षण विशेष लेखा परीक्षक वर्ग 2 सहकारी संस्थेचे सतीश काकासाहेब पोकळे यांनी केले. त्यांनी याचा अहवाल वरिष्ठांना सादर केला. या अहवालात असे नमुद केले आहे की, समृद्ध मराठवाडा मल्टीस्टेट व्हिकल सर्विसेस को-ऑप सोसायटी या नावाने कॅश क्रेडिट 9 कोटी 39 लाख 70 हजार 821 मुदत ठेवीं मधील अपहार श्रीराम मच्छिंद्र बहिर 6 लाख, सुहास संपत जाधवर 30 लाख, कर्ज वितरणातील अपहार व गैरव्यवहार 5 कोटी 50 लाख रूपये केला. असा सर्व मिळुन 15 कोटी 25 लाग 70 हजार 821 रूपयांचा समावेश आहे.
या अपहारास जबाबदार असलेल्या 24 जणांबाबत तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणी मराठवाडा अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचे अध्यक्ष सतीश गंगाधर सावंत, गणेश त्रिंबकराव शेळके, महिंद्र मनमोहन मानधने, विश्वंभर पांडुरंग शिंदे, शिवाजी लक्ष्मण गडदे, अनिता पृथ्वीराज होते, सुनिता भास्करराव खटले, सुमित बाळकृष्ण भावसार, योगेश एकनाथ घुले, पोपट शिवाजी आवाड (वरील सर्व संचालक), मुख्य कार्यकारी अधिकारी किशोरी सतीश सावंत व गजानन विठ्ठलराव डासाळकर, व्यवस्थापक अमोल सुखदेव अंधारे, रविकिरण मधुकर दहिवाळ, भाग्यश्री गगानन डासाळकर, गुलाबाई रूपाजी अंधारे, अंजली अमोल अंधारे, अशोक आता गिरी (वरील सर्व संस्थेचे कर्जदार), लेखापरीक्षक एस.बी. गायकवाड व किरण कमलाकर सावजी, समर्थ मराठवाडा मल्टीस्टेट व्हिकल सर्विसेस को-ऑप सोसायटी लि. माजलगाव या संस्थेचे संचालक मंडळ यांचा समावेश आहे.
तर माजलगाव येथील अन्य दोघांनी जिल्हा बीड संस्थेत तारण असलेली मालमत्ता बनावट दस्ताऐवजा आधारे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संगनमत करून संस्थेच्या अनेक मालमत्ता खरेदी केल्याचे उघड झाले. त्यावरून या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.