9 ते 9.15 या दरम्यान दिवे बंद ठेवले जाणार

बीड, (रिपोर्टर)ः-केंद्र सरकारने वक्फ विधेयक आणले असून या विधेयकाला मुस्लिम समाजाकडून विरोध होत आहे. विधेयक रद्द करावे अशी मागणी केली जात असून त्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीचे आंदोलन करण्यात येत आहेत. आज रात्री 9 ते 9.15 या दरम्यान देशभरात बत्तीगुल आंदोलन करण्यात येणार आहे. सदरील हे आंदोलन मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांच्या वतीने करण्यात येणार आहे. या आंदोलनाला मज्लीस ए उलेमा बीड, वक्फ बचाव कमिटी यांचे समर्थन असून बीडमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन मज्लीस उलेमा ए बीडच्या वतीने करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने गेल्या काही दिवसापुर्वी वक्फ विधेेयक आणलेले आहे. हे विधेयक अन्याय कारक असून सदरील विधेयक रद्द करावे अशी मागणी मुस्लिम समाज व विविध मुस्लिम संघटनांकडून केली जात आहे. त्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीचे आंदोलन ही केले जात आहे. मध्यंतरी प्रत्येक जिल्हा पातळीवर मानवी साखळी आंदोलन करण्यात आले होते. आज रात्री बत्तीगुल आंदोलन करण्यात येणार आहे. 9 ते 9.15 पंधरा मिनट दिवे बंद करून केंद्र सरकारचा निषेध केला जाणार आहे. सदरील या आंदोलनाचे आयोजन मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या आंदोलनाला मज्लीस ए उलेमा बीड, वक्फ बचाव कमिटी चे समर्थन असून ते आंदोलनात सहभागी हेाणार आहेत. आजच्या या आंदोलनामध्ये सर्व समतावादी, मानवतावादी व धर्मनिरपेक्ष विचार श्रेणीच्या नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मज्लीस उलेमा ए हिंदचे सचिव मुफ्ती मोहंमद अन्वर नोमानी यांनी केले आहे. दरम्यान नागरीकांनी 9 ते 9.15 या पंधरा मिनिटाच्या काळात आप आपल्या घरातील, दुकानातील किंवा अन्य उद्योगातील लाईट बंद ठेवून या आंदोलनात सहभाग नोंदवावा आणि वक्फ सुधारणा विधेयकाविषयी आपली नाराजी शांततेने व लोकशाही मार्गाने व्यक्त करावी असे आवाहन करण्यात आले आहे.