
ईदगाह मैदानसह जिल्हाभरातल्या मस्जिदमध्ये अल्लाहकडे प्रार्थना
बीड, (रिपोर्टर)ः- त्याग आणि सर्मपणाची शिकवण देणारी इद-उल-अजहा देशभरासह राज्यात आणि बीड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात मुस्लिम बांधव साजरी करतांना दिसून येत असून आज सकाळी बीड शहरातल्या ईदगाह मैदानासह विविध मस्जिदमध्ये बकरी ईदची नमाज अदा करण्यात आली. शहरासह जिल्हाभरातील विविध गावांमध्ये मुस्लिम बांधवांनी सकाळी मस्जिदमध्ये जावून नमाज अदा करत सुख शांतीची दुवाँ मागितली.
इसलाम धर्मामध्ये ईद-उल-फित्र व ईद-उल-अजहा हे दोन महत्वाचे सण आहेत. हज यात्रा करून परतल्यानंतर ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईद साजरी केली जाते. या सणाचे अनन्य साधारण महत्व असून ईद-उल-अजहा त्याग आणि सर्मपणाची शिकवण देते. बकरी ईद आज देशभरासह राज्यात आणि बीड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. आज सकाळी शहरातल्या ईदगाह मैदानासह विविध मस्जिदमध्ये ईद-उल-अजहा ची नमाज अदा करण्यात आली. जिल्ह्यातल्या विविध मस्जिदमध्ये जावून मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करत अल्लाहकडे सुख शांतीची प्रार्थना केली.