• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड अंबाजोगाई

ऑलम्पियाड परिक्षेत स्वामिनी नखाते

by गणेश सावंत
June 6, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


जिल्ह्यातून प्रथम
गोल्डमेडल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देवून
एएसपी चेतना तिडकेंच्या हस्ते झाला सन्मान


अंबाजोगाई, दि. 5 (प्रतिनिधी) : 2024 मध्ये झालेल्या ऑलम्पियाड परिक्षेत बीड येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कुलची विद्यार्थीनी स्वामिनी अभिजीत नखाते हिने जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यानुसार बुधवारी तिचा गोल्डमेडल, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देवून अंबाजोगाईच्या अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे. स्वामिनीचा हाच सत्कार स्विकारताना तिचे तिचे प्राचार्य गणेश काकडे, वडिल दै. लोकाशाचे उपसंपादक अभिजित नखाते, आई प्रियंका नखाते, भाऊ समर्थ नखाते यांची उपस्थिती होती. यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर कधी अपयश आले तर खचून न जाता परत उभे राहिले पाहिजे. आयुष्याच्या शिखरावर पोहोचल्यावर मोडून पडू नका असे प्रतिपादन यावेळी एएसपी चेतना तिडके यांनी केले.


बीड सहोदया संस्थेतर्फे अंबाजोगाई येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे दहावी, बारावी आणि ऑलम्पियाड परिक्षेतील  गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोदार इंटरनॅशनल स्कूल अंबेजोगाई चे प्राचार्य कीर्तीकुमार देशमुख यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर शारदा इंग्लिश स्कूल केजचे प्राचार्य सोनल मिश्रा यांनी बीड सहोदया चा अहवाल सादर केला. या सोहळ्यासाठी प्रतिष्ठित अतिथी प्रा.अभिजीत लोहिया, अ‍ॅड. संतोष पवार, आणि फिजिक्सवाला अकॅडमीचे डॉन बॉस्को जोसेफ यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळीबीड येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कुलची विद्यार्थीनी स्वामिनी अभिजीत नखाते हिचाही सन्मान करण्यात आला. तिने इयत्ता पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत असताना ऑलम्पियाड परिक्षा दिली होती. या परिक्षेत तिने बीड जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. यावेळी तिला अंबाजोगाईच्या अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके यांनी भरभरून शुभेच्छा दिला. हा सन्मान स्विकारताना तिच्यासोबत तिचे प्राचार्य गणेश काकडे, तिचे वडिल दै. लोकाशाचे उपसंपादक अभिजित नखाते, आई प्रियंका नखाते, भाऊ समर्थ नखाते हेही उपस्थित होते.


विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षणक्षेत्रातील व्यक्तींची उपस्थिती या कार्यक्रमाला शोभा देत होती. मुख्य वक्ता चेतना तिडके यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना जीवनाबद्दलचे महत्त्वाचे विचार मांडले. त्यांनी प्रसिद्ध अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्टच्या कवितेच्या ओळींचा संदर्भ देत विद्यार्थ्यांना जीवनसंघर्षाबद्दल प्रेरणा दिली. स्वतःचे सकारात्मक आणि नकारात्मक गुण लिहून काढा आणि त्यावर ठोस काम करा. सकारात्मक गुणातून आपल्याला नवी ऊर्जा मिळते आणि ती आपल्याला पुढे नेऊन जाते, असा व्यावहारिक सल्ला त्यांनी दिला. प्रा.अभिजीत लोहिया यांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व पटवून दिले. अभ्यासाबरोबर आरोग्यावर सुद्धा लक्ष केंद्रित करावे. शारीरिक आणि मानसिक आरोग्याशिवाय केवळ पुस्तकी ज्ञान कामी येत नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले. आधार माणुसकीचा फाऊंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. संतोष पवार यांनी विद्यार्थ्यांच्या भावी जीवनातील आव्हानांकडे लक्ष वेधले. दहावी आणि बारावी नंतरचा प्रवास हा खरोखरच खडतर प्रवास आहे.

पुढील शिक्षणासाठी कुटुंबापासून दूर जावे लागणार आहे, त्यामुळे समाजामध्ये कसे वागावे, कसे जगावे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे त्यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमातील सर्वात भावनिक क्षण म्हणजे बीड जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवणार्या शौर्य मुगदिया या विद्यार्थ्याच्या आई डॉ.रेखा मुगदिया यांनी व्यक्त केलेले विचार होते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे आम्ही त्याचे पालक दोघेजण डॉक्टर असून आमचा मुलगा इंजीनियरिंगची तयारी करतो. बीड सहोदयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. एमआयटी शाळेचे प्राचार्य सागर राऊत यांनी बीड सहोदया ऑलिम्पियाडचा तपशीलवार अहवाल सादर केला. या कार्यक्रमात बीड सहोदया ओलंपियाड मधून जिल्ह्यात प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचाही त्यांच्या पालकांसमवेत सत्कार करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोदार इंटरनॅशनल स्कूल आंबेजोगाईच्या अनुभवी शिक्षिकेने अत्यंत कुशलतेने केले. शाळेचे प्रशासकीय अधिकारी प्रताप रसाळ यांनी कार्यक्रमाला योग्य गती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन ईगलवूड इंग्लिश स्कूल माजलगावचे प्राचार्य सत्यजित कांजळकर यांनी केले.

Previous Post

मारुती गायकवाड यांचे निधन

Next Post

त्याग आणि सर्मपणाची ईद-उल-अजहा उत्साहात

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
अग्रलेख

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

by गणेश सावंत
July 22, 2026
अंबाजोगाई

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
July 15, 2026
अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post

त्याग आणि सर्मपणाची ईद-उल-अजहा उत्साहात

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार
  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?