
तीन अपहरणकर्ते पोलीसांच्या ताब्यात.
बीड (रिपोर्टर):अपहरणानंतर, विविध घटनांमध्ये, बर्याच जणांची बीड पोलिसांनी सुखरूप सुटका केल्याचे बीड जिल्ह्याने पाहिले आहे. काही घटनांमध्ये, खंडणीसाठी अपहरण करण्यात आले, तर काही जणांचे पैशांच्या व्यवहारातून अपहरण करण्यात आले. असाच काहीसा प्रकार काल दुपारी तेलगाव येथे घडला.
काल दुपारी 2.15 वा. स्थागुशा बीड येथिल पोउपनि श्रीराम खटावकर यांनी दिँदुड पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी महादेव ढाकणे यांना माहिती दिली की, जवळा बाजार ता. औंढा नागनाथ येथुन एक इसमाचे अपहरण करण्यात आले असुन त्यास काही इसमानी एीींळसर कार क्रमांक चक 44 -ए 1191 मध्ये टाकुन घेउन गेले त्यानंतर त्यांचे लोकेशन पात्रुड ता. माजलगाव येथे मिळाले, त्यावेळी सोपनि ढाकणे यांनी तात्काळ पो. स्टे. दिंद्रुड येथिल पोशि 2175 साळुंखे, पोशि 360 गायकवाड, चापोशि 1670 बनसोडे यांना तेलगाव येथे पाठवून नमुद वर्णनाच्या कारचा शोध घेण्याचे सांगीतले. पोलीस पथकाने दुपारी 3.15 सुमारास तेलगाव येथे स्थानिक नागरीकांच्या मदतीने कार थांबवून अपहरण झालेला इसम बळिराम लिंबाजी सांवत तसेच अपहरण करणारे इसम 1) नामदेव माणिक घोळवे रा. अंबेवडगाव ता. धारूर, 2) श्रीमती नागराबाई सुदाम तोंडे रा. धार रोड, परभणी ह.मु. जवळा बाजार ता. औंढानागनाथ जि. हिंगोली 3) बाबुराव गोविंदराव बड़े रा. कसारी ता.धारुर यांना त्यांचे कडील वाहन क्र. चक 44 -ए 1191 सह ताब्यात घेवुन पो.स्टे. दिंदुड येथे आणले. चौकशीनंतर समजले की पैशाच्या व्यवहारातून यातील आरोपी श्रीमती नागराबाई सुदाम तोंडे रा. धार रोड, परामणी ह.मु. जवळा बाजार ता. औंढानागनाथ जि. हिंगोली हीने तीच्या साथीदारांच्या मदतीने बळिराम लिंबाजी सावंत याचे अपहरण केले होते.
अपहरण झालेल्या व्यक्ती वर अपहरणकर्त्यांनी मारहाण केल्याने त्रास होतोय असे सांगितल्यावर त्याच्यावर सरकारी दवाखाना येथे औषधोपचार करण्यात आले. आरोपी व पिडीत इसम यांची माहिती पोउपनि महादेव जिवारे पो. स्टे. औंढा नागनाथ जि. हिंगोली यांना देण्यात आली. औंढा नागनाथ येथील तपास पथक दिंद्रुड येथे आल्यानंतर पिडीत व्यक्ती, आरोपी व गुन्ह्यामध्ये वापरलेली कार त्यांच्या ताब्यात देण्यात आली. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोशि 2175 साळुंखे, पोशि 360 गायकवाड, चापोशि 1670 बनसोडे यांनी केली आहे.