मोटार सायकल चोरीला गेल्यानंतर तपास लागत नाही
तीन दिवस पोलीस तक्रार घेत नाहीत
बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यामध्ये इतर चोर्या प्रमाणेच मोटार सायकल चोर्या वाढल्या. गर्दीच्या ठिकाणी किंवा शासकीय कार्यालय परिसरामध्ये उभ्या करण्यात आलेल्या मोटार सायकली सर्रासपणे चोरीला जावू लागल्या. जिल्हा रूग्णालयाच्या परिसरातून तर दोन तीन दिवसाला मोटार सायकल चोरीला जात आहेत. मोटार सायकल चोरतांना एखाद्या घटनेत चोरटा सिसिटिव्ही कॅमेर्यात कैद झाला तरी त्याचा तपास पोलिसांना लागत नाही.मोटार सायकल चोरीची तक्रार देण्यासाठी संबंधित नागरीक पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्यांना तीन दिवस थांबण्याचा सल्ला दिला जातो. गेल्या वर्षेभरात अनेक मोटार सायकली चोरीला गेल्या. चोरीला गेलेल्या मोटार सायकल सापडत नाही. जिल्ह्यात मोटार सायकल चोरणार्या टोळ्या असल्याचे या घटनेवरून तरी दिसून येत आहे. पोलीस प्रशासनाने या टोळ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेदिवस वाढू लागल्या आहेत. त्यातच चोर्या सर्रासपणे होत आहेत. मोटारसायकल चोरीचे प्रमाण गेल्या काही वर्षापासून अधिक वाढले. गर्दीच्या ठिकाणी किंवा शासकीय कार्यालय, बँक, खाजगी कार्यालय, जिल्हा रूग्णालय परिसरात उभ्या करण्यात येत असलेल्या गाड्या चोरीला जात आहेत. जिल्हा रूग्णालय परिसरातून तर दोन ते तीन दिवसाला एक गाडी चोरीला जात आहे. गाडी चोरीला गेल्यानंतर संबंधित व्यक्ती तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जातात मात्र त्यांना तीन ते चार दिवस थांबण्याचा सल्ला दिला जातो. गाड्या चोरीला गेल्यानंतर शक्यतो त्या सापडत नाहीत. गाड्या चोरणार्या टोळ्या जिल्ह्यात सक्रीय असल्याचे या घटनेवरून तरी दिसून येत आहे. एखाद्या घटनेत गाडी चोरतांना चोरटा सिसिटिव्ही कॅमेर्यामध्ये दिसून आला तरी त्या चोरट्याचा शोध पोलिसांना लागत नाही. जिल्हा रूग्णालयातून आतापर्यंत अनेक गाड्या चोरीला गेल्या काही घटना सिसिटिव्हीत कैद झाल्या मात्र त्या चोरट्याचा शोध पोलिसांना लागला नाही. दरम्यान पोलीस प्रशासनाने गाड्या चोरणार्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वाहन धारकांतून केली जात आहे.