
बीड, (रिपोर्टर)ः- पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भुई गल्ली येथे एका घरात गुटखा असल्याची माहिती पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी सदरील ठिकाणी धाड टाकून 1 लाख 9 हजार 17 रूपयांचा गुटखा व मोटार सायकल जप्त केली आहे.
भुई गल्ली येथील मयत वाजेद हसन बागवान यांचे घर भाड्याने घेवून त्यामध्ये गुटखा ठेवण्यात आला होता. याची माहिती पेठ बीड पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून छापा मारला. त्यात 1 लाख 9 हजार 17 रूपयांचा गुटखा व मोटार सायकल असा एकूण 1 लाख 39 हजार 17 रूपयांचा मुद्देंमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपी शेख खदीर शेख बशीर, शेख अर्सला शेख खदीर या दोघांजणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील ही कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक अशोक मोदीराज, पो.हे.कॉ. रमेश, अल्ताफ, अनिल यांनी केली आहे.