बीड (रिपोर्टर)
महागाई, बेरोजगारी गगनाला भिडली आहे. त्यातच जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावल्याने व्यापार्यांसह सर्वसामान्य लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. महागाई विरोधात शिरूरमध्ये काँग्रेस आक्रमक होत तहसीलदारांना निवेदन दिले.
केंद्र सरकारने वाढवलेल्या महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना आणि जीवनावश्यक गोष्टींवर लादलेली जीएसटी मागे घ्यावी, या मागणीसाठी शिरूर कासार काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. हे आंदोलन खा. रजीनाताई पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील, जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश सानप, भास्कर केदार, आसिफभाई शेख, काँग्रेसचे बीड विधानसभा माजी अध्यक्ष प्रा. संभाजी जाधव, बारीकराव खेंगरे, अशोक केकाण, कानिफनाथ विघ्ने, बालासाहेब सातोडे, अशोक यादव, संतोष मुळीक, सखाराम मुळीक यांनी केले. या वेळी मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.