बीड । मजीद शेख
सध्याच्या सरकारचा काल मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. यात 18 मंत्र्यांना मंत्रीपदाची शपथ दिली. आणखी काही दिवसांनी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. विरोधात असतांना विरेाधक सत्ताधार्यांना किती प्रमाणात घेरतात याला लोकशाहीत महत्व आहे. विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहाला विरेाधीपक्ष नेता असतो. या दोन्ही नेत्याला तितकं महत्व आहे. विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेते पदी शिवसेनेच्या वतीने अंबादास दावने यांची निवड करण्यात आली. दानवे हे आक्रमक असल्याचे सांगितले जाते. त्यांचा आक्रमकपणा सत्ताधार्यांना किती प्रमाणात घायाळ करतो हे येत्या काही दिवसात दिसेलच. अलीकडच्या काळात विरोधी पक्ष नेता म्हणुन धनंजय मुंडे यांची कारर्कीद चांगली राहिली. त्यांची बोलण्याची शैली,अभ्यापुर्ण मांडणी आणि समोरच्यावर कसं तुटून पडायचं हे धनंजय मुंडे यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. प्रविण दरेकर दोन वर्ष विधानपरिेषदेचे विरोधी पक्ष नेते होते पण, त्यांची अशी काही विशेष कामगिरी दिसली नाही. शिंदे यांनी शिवसेना फोडल्याने शिवसेनेची मोठी वाताहत झाली. मराठवाड्यात शिवसेनेचा चांगला विस्तार आहे, पण शिंदेच्या मागे मराठवाड्यातील शिवसेनेचे नेते मोठ्या प्रमाणात गेल्याने उध्दव ठाकरे यांनी मराठयातील विरोधी पक्ष नेता म्हणुन दानवेंची निवड केली. दानवे मराठवाड्यातील शिवसेनेला कितीप्रमाणात उभारी देतात व नव्या सत्ताधार्यांना कशापध्दीने सळो कि, पळो करतात हे येत्या काळात दिसेल.
राजकारणात अनेक चढ-उतार येत असतात. आपली सत्ता आणण्यासाठी प्रत्येक पक्ष परिश्रम घेत असतो. जो विरोधात असतो. तो सत्ताधार्यांना नेहमीच कोंडीत पकडत असतो. सत्ताधार्यांवर अंकूश ठेवण्याचं काम विरोधकाचं असतं. विधानसभा आणि विधान परिषद हे राज्यात दोन सभागृह आहेत. या दोन्ही सभागृहात जो नेता आपल्या कामाची छाप पाडतो तो जनतेच्या मनावर सुध्दा राज्य करत असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्याने शिवसेनेचे मोठे नुकसान झाले, हे नुकसान कसे भरुन काढायचं याचा विचार शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे करत आहेत. अलीकडच्या काळात विधानरिषदेच्या विरोधी पक्ष नेत्याला चांगलं महत्व प्राप्त झालं. पुर्वी विधानपरिषदेचा नेता तितका चर्चेत नसायचा. धनंजय मुंडे हे 2012 पासून राष्ट्रवादीत आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर मुंडे यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली. मुंडे यांनी आपलं कर्तृत्व कामाच्या माध्यामातून दाखवून दिलं होतं. त्यांची बोलण्याची शैली, अभ्यासपुर्ण मांडणी हे सभागृहालाच नाही तर जनतेला भावणारी ठरली. त्यांनी त्यावेळी सत्ताधार्यांना सळो की, पळो करुन सोडलं होतं. विधानसभेच्या विरोधीपक्ष नेत्याला जास्त कुणी ओळखत नव्हतं. त्यांची तितकी चर्चा सुध्दा होत नव्हती. त्यावेळी विखे पाटील काँग्रेसकडून विरोधी पक्ष नेते होते. विखेंना विरोधीपक्ष नेतापद झेपलं तर नाहीच, पण त्यांनी आपल्याकडे विरोधीपक्ष नेता पद असतांना भाजपात प्रवेश केला होता, ही एक आश्चर्याचीच बाब ठरली होती. सध्या भाजपा, शिंदे याचं सरकार सत्तेवर आहे. त्यांचा मंत्रीमंडळ विस्तार झाला. विरोधात असतांना विरोधकांना आपलं काम दाखवावं लागतं. विरोधक म्हणुन रोख भुमिका बजवावी लागते. विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी अजित पवार यांची नियुक्ती झाल्यानंतर संख्या बळानूसार विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदी मराठवाड्यातील अंबादास दानवे यांची निवड करण्यात आली. दानवे यांची निवड करण्यामागे अनेक कारणे असू शकतात. मराठवाड्यात शिवसेनेचा मोठा दबदबा असतांना मराठवाड्यातील शिवसेनेचे जास्ती जास्त नेते शिंदे यांच्या पाठीमागे गेले आहेत. तसेच दानवे हे आक्रमक नेते म्हणुन ओळखले जातात. त्यामुळेच त्यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली. दानवे यांच्यामुळे मराठवाडयात पुन्हा शिवसेनेचा दबदबा दिसेल असं पक्षाला वाटलं असावं म्हणुन दावने यांच्याकडे विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेते पद दिलं. दोन वर्ष भाजपाचे प्रविण दरेकर हे विधान परिेषदेचे विरोधी पक्ष नेते होते. दरेकर यांची विशेष कामगिरी दिसून आली नाही. दानवे यांच्यावर महत्वाची जबाबदारी आली. त्यांना आपलं कार्य दाखवण्याची चांगली संधी आली ते कशापध्दतीने विरोधकांना घेरतात आणि आपला विरोधी बाणा किती प्रमाणात यशस्वी करुन दाखवतात हे येत्या काळात दिसून येईल.