साधारणत: 10 ते 12 दिवसांपूर्वी विनायक मेटे यांचा मला फोन आला होता. ताई, मला तुमचा वेळ हवा आहे, किमान 15 मिनिटे वेळ द्या, मला तुमच्याशी खूप काही बोलायचे आहे, मी त्यांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 15 ऑगस्ट साजरा होऊ द्या, नंतर आपण भेटू, असे म्हणाले होते. मी त्यांना त्याचवेळेस वेळ दिला असता आणि भेट झाली असती तर ते मला काय बोलणार होते हे कळाले असते. मात्र काय बोलायचे हे मेटे यांच्या पोटातच राहून गेले. मेटे हे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अगदी राजकारणात त्यांनी समाजकारण करता करता मोठे आढळस्थान निर्माण केले होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मेटे ज्या प्रश्नासाठी संघर्ष करत होते ते म्हणजे मराठा समाजाचं आरक्षण. ते आरक्षण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी द्यावे, असेही आपल्या श्रध्दांजलीपर भाषणात माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले मत व्यक्त केले.