Saturday, January 23, 2021
No menu items!
Home Uncategorized शाहीनबाग ते शेतकरी आंदोलन केंद्र सरकाच्या संवेदना गोठल्या

शाहीनबाग ते शेतकरी आंदोलन केंद्र सरकाच्या संवेदना गोठल्या


संसदेत बहुमत आहे, म्हणजे ते बहुमत पुर्णंता जनतेचं असेल असं नसतं. संसदेतील बहुमत हे संख्याबळाचं असतं. संसदेने एखादा कायदा केला असेल तर तो कायदा जनतेला मान्य नसेल तर त्या कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्याचा अधिकार देशातील जनतेला आहे. आम्ही म्हणतो तेच योग्य हे जे भाजपाचं ‘अतिरेकी’ धोरण सुरु आहे ते लोकशाहीला धरुन नाही. ज्या-ज्या-ज्या वेळी भाजपाच्या नीती विरोधात आंदोलन केेले गेेले. विरोध केला गेला. त्या-त्या वेळी भाजपाने व त्यांच्या समर्थकांनी आंदोलन करणारांना आपला विरोधक मानलं. फक्त विरोधक मानलं नाही तर त्यांना देशद्रोही, खलिस्तानवादी, विदेशी, नक्षलवादी असं म्हणुन त्यांचा पाणउतारा केला. जेव्हा कॉंग्रेसची सत्ता होती, तेव्हा भाजपा अनेक मुद्दे घेवून रस्त्यावर उतरुन आंदोलन करत होतं. तेव्हा भाजपाला कधीच कोणी वेगळे विश्‍लेषण लावले नाही, किंवा अन्य काही म्हणुन त्यांचा पाणउतारा केला नाही. भाजपाने विकासाचे मुद्दे बाजुला ठेवून समाजात जातीय विभाजन कसे होईल याचा जोरदार प्रयत्न सुरु केला. लोकांना जात-धर्म यातच अडकवून ठेवण्याचा जोरदार प्रयत्न सुरु आहे. एकीकडे लोक रोजगार द्या म्हणुन ओरड करत आहे तर दुसरीकडे भाजपाला ‘लव्हजिहाद’ सारखे मुद्दे महत्वाचे वाटतात. कृषीच्या कायद्या विरोधात दिल्लीच्या बॉर्डरवर गेल्या एक महिन्यापासून शेतकर्‍यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला भाजपाने काय-काय उपमा दिली नाही? शेतकर्‍यांच्या हितासाठी कायदा केलाचा दावा भाजपा करत आहे. शेतकर्‍यांना आपलं हित कशात आहे याची जाण असेलच ना? शेतकर्‍यांना वाटलं असतं केंद्राने आणलेला कायदा चांगला आहे तर इतक्या मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीत आंदोलनात सहभागी झाले नसते याचा विचार भाजपावाले का करत नाही.
थंडीची पर्वा न करता
थंडीचे दिवस असल्याने दिल्लीत प्रचंड प्रमाणात थंडी आहे. थंडीची पर्वा न करता, लाखो शेतकरी गेल्या ३५ दिवसापासून आंदोलनाची मशाल हाती घेवून रस्त्यावर बसलेले आहेत. या शेतकर्‍यांनी एक महिन्यापासून आपल्या घरा-दाराचा विचार केला नाही. आपल्या शेतीचा विचार केला नाही, किवा गावाकडे काय परस्थिती आहे याचा ही विचार न करता. आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. काही शेतकरी आपल्या मुलांना, महिलांना सोबत घेवून आंदोलनात सहभागी झाले. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा शेतकर्‍यांचे एवढे मोठे आंदोलन होत आहे. एक महिन्याचे राशन घेवून शेतकरी दिल्लीत धडकले होते. आता त्यांचे राशन ही संपत आले, शेतकर्‍यांच्या जेवणाची सोय लंगरमध्ये करण्यात आली. रस्ता हाच शेतकर्‍याचा आधार ठरु लागला. रस्त्यावरच महिला शेतकर्‍यांना स्वयंपाक करण्याची वेळ आली. आंदोलन स्थळ एक एैतिहासीक स्थळ बनू लागलं. भविष्यात कुणी आंदोलन केलं तर सध्याच्या आंदोलनाचा उल्लेख आवर्जुन करावा लागेल. हरियाना, पंजाब, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशसह इतर राज्यातील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले. महाराष्ट्रातील बहुतांश शेतकर्‍यांनी व नेत्यांनी या आंदोलनाला समर्थन दिले. ज्यांना-ज्यांना शेतकर्‍यांच्या प्रति प्रेम आहे. ती मंडळी या आंदोलनात सहभागी झाली. जो पर्यंत जाचक कृषी कायदा गुंडाळला जात नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला दाद द्यावी लागेल. केंद्र सरकार शेतकर्‍यांची परिक्षा पाहत आहे. शेतकरी आंदोलनात फुट पाडण्याचा प्रयत्न सत्ताधार्‍याकडून करण्यात आला. काही भाजपाच्या बाजुने असलेल्या मीडीयाने आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. चुकीच्या पध्दतीने बातम्या दाखवून दिशाभूल केली गेली. विरोधाची कसलीही पर्वा न करता. एक इंचही पाठीमागे न हाटता बहाद्दर शेतकरी आंदोलनात ठामपणे उभे आहेत हीच खरी जमेची बाजु आहे.
शाहीनबाग ते शेतकरी आंदोलन
केंद्र सरकारने नागरीकत्व कायदा आणला. हा कायदा मुस्लिमासह भटके लोक व ज्यांच्याकडे कसलेही कागदपत्र नाही त्यांच्यासाठी जाचक ठरणार आहे. या कायद्याचा विरोध केला गेला. कायदा रद्द करण्याची मागणी देशातील नागरीकांनी केली. त्यात मुस्लिमांची संख्या जास्त होती. या कायद्याच्या विरोधात दिल्ली येथून आंदोलनाला सुरुवात झाली होती, हे आंदोलन ‘शाहीनबाग’ म्हणुन परिचीत झाले होते, दिल्लीच्या आंदोलनाची धग देशाच्या विविध राज्यात आणि जिल्हा पातळीपर्यंत पोहचली होती, प्रत्येक जिल्हा पातळीवर शाहीनबाग आंदोलन सुरु झाले होते, या आंदोलनातून केंद्राच्या नागरीकत्व कायद्याला विरोध करण्यात आला. आंदोलनाला टोमणे मारण्याचे काम करण्यात आले. सोशलमीडीयातून प्रचंड प्रमाणात बदनामी करण्यात आली. आंदोलन करत असतांना आंदोलनकर्ते आणि सरकार यांच्यात चर्चा व्हायला हवी होती, चर्चाच होत नसेल तर ते सरकार कसले? चर्चेतून काही तरी मार्ग निघत असतो, पण कसल्याही प्रकारची चर्चा करायची नाही. आंदोलनाची दखल घ्यायची नाही. उलट आंदोलन कसे बदनाम होईल? ते कसे मोडून पडेल? असाच प्रयत्न सत्ताधार्‍यांच्या वतीने करण्यात आला. शाहीनबागचं आंदोलन एक महिन्यापेक्षा जास्त कलावधी पर्यंत चाललं. एवढं मोठं आणि इतके दिवस चालणारे हे आंदोलन पहिलेच होते, जे शाहीनबागच्या बाबतीत झालं तेच दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत होत आहे. सत्तेची इतकी धुंदी बरी नसते. रस्त्यावर उतरुन आंदोलन करणारे माणसंच आहेत आणि ते ही याच देशातील आहेत याचं भान ठेवायला हवं.
सगळीकडे वेळ आहे
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘मन की बात’मधून देशाला संबोधीत करत असतात. त्यांच्या ‘मनकी बात’मध्ये लोकांच्या मनची बात येत नाही. आज पर्यत मोदी कधी शाहीनबागच्या आंदोलना बाबत बोलले नाही किंवा दिल्लीतील शेतकर्‍यांच्या आंदोलनाबाबत बोबले नाहीत. त्यांना हे आंदोलन एक षडयंत्र वाटतं. इतक्या मोठ्या संख्येने आंदोलन करणारे ‘वेडे’ थोडेच असतात? जे की कोणाच्या सांगण्यावरुन आपलं घरदार सोडून आंदोलन करतील? बिहारच्या निवडणुकीत प्रचार करायला आणि रॅली काढायला भाजपावाल्यांना वेळ असतो. कोरोनाचा सर्ंसग असतांना हजारोंच्या संख्येने पश्‍चीम बंगालमध्ये गृहमंत्री अमित शहा रॅली काढतात. तेव्हा तेथे कुठलाही कोरोनाचा धोका नसतो, संसर्ग वाढत नाही. मात्र संसदेला कुलूप लावलं जातं. त्याला कारण कोरोनाचं दाखवलं जात आहे. कधी नव्हे ते संसंदेला कुलूप लावण्यात आलं. जगात कोरोना आहे. कोरोना काळात जगातील कोणत्याही लोकशाही देशाने आपल्या संसदेला कुलूप लावण्याचा करंटापणा केला नाही तो भाजपाने केला. विरोधक आपल्याला अधिवेशनात घेरतील आणि कृषी बिलाच्या बाबतीत आपल्याला उत्तर द्यावे लागेल, म्हणुन संसदच न उघडण्याचा निर्णय भाजपाने घेतला. संसदेला कुलूप ठोकणारेच पुन्हा लोकशाहीची भाषा करतात म्हणजे हे कमालीचं आश्‍चर्य म्हणावं लागेल? दुसरीकडे राज्यातील भाजपावाले महाराष्ट्रात लोकशाही धोक्यात असल्याची बोंब ठोकतात. राज्यात कोणत्या अंगाने लोकशाही धोक्यात आहे, याचं विश्‍लेषण मात्र ते करत नाही. दिल्लीत शेतकर्‍यांचे इतके दिवस झाले आंदोलन सुरु आहे, याची दखल भाजपाचे सत्ताधारी घेत नाही, तेव्हा दिल्लीत लोकशाही धोक्यात आहे असं भाजपावाल्यांना वाटत नाही का?
एक नटीला महत्व
कुण्या एका नटीने सोशलमीडीयातून टिवटिव करावं आणि त्यांची दखल भाजपाला घ्यावी वाटते पण स्वत:च्या हक्कासाठी लढा देणार्‍या शेतकर्‍यांची भाजपावाल्यांना कीव येत नाही. भाजपाची सत्ता आहे, म्हणुन भाजपावाले कसेही नाचले तरी चालतात. नटीच्या सुरक्षेसाठी मोठा फौजफाटा दिला जातो. दुसरीकडे कित्येक लोक सुरक्षेविना आंदोलन करतात त्यंाची कसलीही किंमत केली जात नाही. उलट आंदोलनकर्त्यांना लाठ्या-काठयाने मारहाण करुन त्यांना जखमी केले जाते. इंग्रजापेक्षा सध्याचं केंद्र सरकार कठोर वागू लागलं. दिल्लीच्या आंदोलनात आता पर्यंत ५० शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. आंदोलनात इतके शेतकरी मरण पावल्याची ही पहिलीच दु:खद घटना घडली. ही घटना सत्ताधार्‍यांना शरम आणणारी आहे. देशातच नव्हे तर जगाच्या पातळीवर हे आदोलन चर्चेचा विषय झाला. आंदोलन करत असतांना शेतकरी मरत आहे तरी आंदोलनकर्ते डगमगले नाहीत. शेतकरी बहाद्दर असतात, हे त्यांनी आपल्या आंदोलनातून दाखवून दिले. सुरक्षेच्या गराड्यात राहून एक ‘नटी’ आदंोलनकर्त्या महिलेला भाडोत्री म्हणुन हिणवते यातून त्या ‘नटीची’ लायकी कळते. त्या नटीचे बापजादे शेतकरी असते तर त्या ‘नटी’ने आंदोलनकर्त्या वृध्द महिलेला भाडोत्री म्हणुन उपमा दिली नसती. भाजपाच्या बाजुने बोलते म्हणुन त्या नटीला भाजपावाले इतका भाव देत आहे का?
मत छेड किसान को
दिल्लीतील शेतकरी आंदोलन इतके दिवस सुरु राहण्यास केंद्र सरकार जबाबदर आहे. देशाचे कृषी मंत्री तोमर आहे. त्यांनी कधी शेतीचा अभ्यास केला असं दिसत नाही. तसं त्यांचं वर्तन ही नाही. ते फक्त नावाला कृषी मंत्री दिसतात. आंदोलन कर्त्याची लहान-लहान मुलं कडाक्याच्या थंडीत आपल्या आई-वडीला समर्थन देतात. एका सहा वर्षाच्या मुलीचे बोल सगळ्याचे लक्ष वेधून घेत आहेत. तीचं भाषण हे र्‍हदय हेलावून टाकणारं आहे. ती लहान चिमुकली म्हणते ‘‘हमारी लढाई तीन काले कानुन के साथ-साथ सत्ता, बिकाऊ मीडीया, गलत जानकारीया, हार्ड पिगलानेवाले सर्दी से’’ मै यहा पर नही आती तो मेरे पापा को बार-बार शरमिंदा करती! किसान आंदोलन को एक महिना हो चुका है! असं म्हणत ती मुलगी पुढे म्हणते ‘होश मे आय हुकूमत तेरे घर कच्चे हो रहे’! मत छेड किसान को लढना मुश्कील होगा, वरना एैसे लिखेने इतिहास पढना मुश्किल होगा! शेतकर्‍याची लहान मुलगी केंद्राला जबरदस्त आव्हान देत आहे. केंद्र सरकार आणखी किती शेतकरी आंदोलनकर्त्यांचे मरण पाहणार आहे? त्यांना किती त्रास देणार आहे? शेतकरी आपला संपुर्ण संसार घेवून दिल्लीच्या सिमेवर न्याय मागण्यासाठी बसलेला आहे. तो ही थंडीत कुडकुडत, मात्र आपलं सरकार मोठं पाघरुन घेवून गाढ झोपलेलं आहे. थंडीच्या कडाक्याने सरकारमधील माणुसकीच्या संवेदनाही बोथट झाल्या की काय? संवेदना बोथट होणं हे काही लोकशाहीच्या बाबतीत चांगलं लक्षण नाही.

Most Popular

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत आम आदमी रस्त्यावरच बसणार

विभागीय अध्यक्षानंी नगरपालिका प्रशासनावरदागली तोफबीड (रिपोर्टर)- नगरपालिका प्रशासन शहरवासियांच्या समस्या जाणून घेण्यात उदासिनता दाखवत आहे. गेल्या चार दिवसांपासून रस्त्याच्या मागणीसांी आम आदमी...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...