गेवराई (रिपोर्टर) येथील नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुशील जवंजाळ यांच्या मातोश्री सौ.शांताबाई वैजिनाथराव जवंजाळ यांचे आज मंगळवार दि.23 रोजी पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे 65 वर्ष वय होते. सौ. शांताबाई या गेवराई शहरातील नामांकित डॉ.वैजिनाथराव जवंजाळ यांच्या पत्नी तर नगराध्यक्ष सुशील जवंजाळ यांच्या मातोश्री होत. दरम्यान सकाळी 10 वा. त्यांच्यावर चिंतेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व क्षेत्रातील अनेकांची उपस्थिती होती. त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी सुना, नातवंडे असा परिवार आहे. जवंजाळ परिवाराच्या दुःखात सायं.दै.रिपोर्टर परिवार सहभागी आहे.