बीड (रिपोर्टर) गेल्या एकवीस वर्षांपासून बीडकरांना हॉटेलच्या माध्यमातून दर्जेदार सेवा देणारे सुस्कर कुटुंब आता बीडकरांच्या सेवेत घेवून येत आहेत हॉटेल ग्रॅण्ड यशोदा.
बीड शहरातच नव्हे तर जिल्ह्यातही प्रथमच अत्यंत अत्याधुनिक आणि सुसज्ज असे फक्त शुद्ध शाकाहारी आणि प्रशस्त अशा वातानुकुलीत रूम असलेल्या हॉटेल ग्रॅण्ड यशोदाचे लोकार्पण येत्या बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. धाकटी पंढरी असलेल्या श्री क्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती महंत ह.भ.प.श्री शिवाजी महाराज, श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती ह.भ.प. न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री आणि चाकरवाडी संस्थानचे ह.भ.प. श्री महादेव महाराज यांच्या शुभाशिर्वादाने आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणातील भीष्माचार्य जेष्ठ नेते श्री शिवाजीराव (दादा) पंडीत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शुभारंभाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. दि.31 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 6.01 मि. हा शुभारंभाचा कार्यक्रम बार्शी रोड, शिवाजीनगर बीड येथे पार पडणार आहे. ऐतिहासिक असणार्या बीड नगरीच्या वैभवात भर घालणारी ही वास्तू सुस्कर परिवाराने उभारून बीड वासियांसाठी मोठी पर्वणीच दिली आहे. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमधील हॉटेलमध्ये उपलब्ध असणार्या सुविधा आता बीडवासियांना देखील मिळणार आहेत. स्वादिष्ट व रुचकर अशा शुद्ध शाकाहारी जेवणासोबतच सुसज्ज पार्किंग, प्रशस्त असे प्रेसिडेन्शीयल सुट, डिलक्स रूम, बॅक्वेट हॉल, छोट्या मोठ्या वाढदिवसाच्या पार्ट्या, कॉन्फरन्स , मिटींग यांसारख्या कार्यक्रमांसाठी हे एक आदर्श ठिकाण या निमित्त्ताने नागरिकांना उपलब्ध होणार आहे. या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी आपणही सादर निमंत्रीत आहात.