Friday, May 20, 2022
No menu items!
Homeबीडगेवराईथकीत वीजबिल ग्राहकांविरोधात वीज वितरण कंपनीची कारवाई मोहीम सुरू

थकीत वीजबिल ग्राहकांविरोधात वीज वितरण कंपनीची कारवाई मोहीम सुरू


अनाधिकृत वीज जोडणी करणार्‍या ग्राहकाविरुद्ध
गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल
गेवराई (रिपोर्टर) वीज बिलाची थकीत राहीलेली रक्कम न भरणार्‍या वीज ग्राहकांना येथील उपविभागीय कार्यालयाने संबंधित ग्राहकाचे कनेक्शन कट करण्याची मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, वीज वितरण कंपनीकडून कट करण्यात आलेली लाईन अनाधिकृतपणे पून्हा जोडणी करणार्‍या एका ग्राहका विरूद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वीज वितरण कंपनीकडून धडक कारवाई होत असल्याने वीज बिलाचा भरणा न करणार्‍या ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे.
शहरातील गणेश नगर येथील बळीराम लहुराव बिलगुडे यांच्याकडे लाईटची थकबाकी असून, त्यांचे कनेक्शन कंपनीकडून कट करण्याची कारवाई करण्यात आली होती. मात्र, १३ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याचे सुमारास संबंधित ग्राहकाने अनाधिकृतपणे कनेक्शन जोडण्याचा प्रयत्न केला. सदरील बाब, कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्‍यांच्या लक्षात आल्याने वीज वितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता शिवलकर यांनी बिलगुडे यांच्या विरूद्ध बेकायदेशीर वीज जोडणी कायद्यानुसार कारवाई करण्याची फिर्याद गेवराई पोलीसात दिल्यानंतर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असल्याने या कारवाईने वीज ग्राहकात एकच खळबळ उडाली आहे. मात्र ज्या ग्राहकांकडे वीज बिल थकीत आहे त्यांनी तात्काळ आपले बिल भरणा करावा नसता कनेक्शन कट करण्यात येईल असा इशारा वीज वितरण कंपनीच्या वतीने कार्यकारी अभियंता शिवलकर यांनी दिला आहे.

Most Popular

error: Content is protected !!