दोन शिक्षकांवर चालत होती शाळा
पालकांनी व्यक्त केला संताप
शिक्षकांची व्यवस्था होणार
बीड (रिपोर्टर)ः- वानगांवच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये फक्त दोनच शिक्षक नियुक्त आहे. त्यातील एक शिक्षक दांडी बहाद्दर असल्याने मुलांचे शैक्षणीक नुकसान होत आहे. दोषी शिक्षकाविरोधात कारवाई करावी आणि शाळेवर वाढीव शिक्षक नियुक्त करावे या मागणीसाठी आज गावकर्यांनी जिल्हा परिषद कार्यालयात मुलांची शाळा भरवली होती. गावकर्यांनी सिईओ पवार यांच्याशी चर्चा केली. सिईओंनी दोषी असलेल्या शिक्षकाचा अहवाल आल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन देत शाळेवर दोन शिक्षक देण्याचे आश्वासीत केले आहे. सिईओंच्या या आश्वासनानंतर गावकर्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.घटनास्थळी शिक्षण विभागाचे अधिकारी ही आले होते.
बीड पासून काही अंतरावर असलेल्या वानगांवच्या जि.प.शाळेमध्ये शंभर मुलं आहे. ही शाळा सातवी पर्यंत असून या शाळेवर दोन शिक्षक आहे. यातील एक मुख्याध्यापक आणि एक शिक्षक आहे. दोन्ही पैकी गुंजाळ नामक शिक्षक गैरहजर राहतात. त्यामुळे मुलांचे शैक्षणीक नुकसान होत आहे. या प्रकाराकडे शिक्षक विभाग दुर्लक्ष करत असल्याने गावकर्यांनी आज जिल्हा परिषद कार्यालयातच मुलांची शाळा भरवली. या घटनेने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली. गावकर्यांनी सिईओ पवार यांच्याशी चर्चा केली. दोषी शिक्षकाचा अहवाल आल्यानंतर त्याच्यावर कारवाई करु व शाळेला दोन शिक्षकाची नियुक्ती करु असे आश्वासन गावकर्यांना देण्यात आल्यानंतर गावकर्यांनी आपले हे आंदोलन मागे घेतले. शिक्षण विभागाचे अधिकारीही आंदोलनस्थळी दाखल झाले होते.