वडवणी (रिपोर्टर) पिक आणि केसीसी कर्ज प्रकरण बँक प्रशासन मार्गी लावत नसल्यामुळे डोंगरपट्ट्यातील शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत आज चिंचवण येथील एसबीआय बँक समोर ठिय्या मांडत आंदोलन केले यावेळी भाजपा युवा मोर्चाचे वडवणी तालुकाध्यक्ष ईश्वर तांबडे यांनी मध्यस्थी करत याविषयी थेट खासदार डाँ.प्रितमताई मुंडे यांना फोन लावला एका मिनीटातच प्रश्न मार्गी लावला असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
याबाबत आधिक माहिती अशी की,वडवणी तालुक्यातील मौजे चिंचवण याठिकाणी भारतीय स्टेट बँकेची शाखा कार्यरत आहे.या अंतर्गत चिंचवण, कोठारबन, सोन्नाखोटा, पिंपळा, रुई, चिखलबीड, खडकी, देवळा सह डोंगरपट्ट्यातील गांवे दत्तक आहेत.परंतु गेल्या अनेक महिन्यापासून बँक प्रशासन मनमानी कारभार करत असल्याच दिसून येत असल्याने आज सकाळी 11 वा.बँक समोर पिक आणि केसीसी प्रकरण मार्गी लावण्यात यावे अशी मागणी करत ठिय्या आंदोलन करण्यात आले.यादरम्यान भाजपा युवा मोर्चाचे वडवणी तालुकाध्यक्ष ईश्वर तांबडे यांनी मध्यस्थी केली असून बँक प्रशासनाची थेट तक्रार भ्रमणध्वनीद्वारे खासदार डाँ.प्रितमताई मुंडे यांच्याशी केली तेव्हा तात्काळ खा.मुंडे यांनी बँक प्रशासनाशी बोलून 15 दिवसांत प्रकरण निकाली काढा असे आदेश दिले व ते बँक प्रशासनाने देखील हमी देत प्रकरण निकाली काढू असे सांगत प्रकरण निकाली न काढण्यास बँकेला भेट देईल अस आश्वासन देखील यावेळी खा.मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिले तेव्हा सदरील शेतकऱ्यांचा ठिय्या माघारी घेतला आहे.यामुळे शेतकऱ्यामधून समाधान व्यक्त केलं जात असुन खा.डाँ.प्रितमताई मुंडे यांच्यासह ईश्वर तांबडे यांचे देखील शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत.










