माजलगाव (रिपोर्टर) माजलगाव शहरातील गजानन रोड, परिवर्तन बँकेसमोर असलेली फेमस दुध डेअरी काल रात्री अनोळखी दोन इसमाने फोडून दुध डेअरीतील रोख 1 लाख 9500 रूपयासह एक मोबाईल लंपास केला. याप्रकरणी दोघाजणाविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिस बाबु शेख यांची माजलगाव शहरातील गजानन रोड परिवर्तन बँकेसमोर फेमस नावाची दुध डेअरी आहे. काल रात्री त्यांनी दुध डेअरी बंद करून घरी गेले असता अनोळखी दोन इसमांनी शटर उचकटून गल्यातील 1 लाख 9500 रूपये आणि एक मोबाईल लंपास केला. या प्रकरणी शेख यांच्या फिर्यादीवरून माजलगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.