Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडधारूरधारूर येथील सामाजिक वनीकरण कार्यालयात प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण झाले नाही

धारूर येथील सामाजिक वनीकरण कार्यालयात प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण झाले नाही

किल्ले धारूर (रिपोर्टर)
धारूर शहरातील आडस रोडवरअसलेल्या सामाजिक वनीकरणकार्यालयात आज प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण झाले नाही

संबंधित कार्यालयात ध्वजारोहन झाले नसल्याची तक्रार काही नागरिकांनी तहसीलदार यांच्याकडे केली तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना सूचना देऊन कार्यालयीन पंचनामा करण्यास सांगितले सदरील कार्यालयात पंचनामा करण्यासाठी
सर्व मंडळ अधिकारी कुरेशी व तलाठी मोहिते यांनी पंचनामा केला असता वनक्षेत्रपाल जगदीश भांगे हे एकच कर्मचारी उपस्थित होते व पंचनामा मध्ये कार्यालयात संगणक प्रिंटर कपाट या प्रकारच्या कसली सुविधा नसल्याचे दिसून आले व सदरील कार्यालयाला वरिष्ठ कार्यालय मार्फत ध्वजारोहणासाठी कसलेही साहित्य पूरवले नाही मी एकटा असल्यामुळे ध्वजारोहण केले नाही आमच्या कार्यालयाच्या पाठीमागे दहा फुटावर यशोदीप इंग्लिश स्कूल आहे त्या ठिकाणी मी ध्वजारोहण केले असल्याचे चे संबंधित कर्मचाऱ्याने पंचनाम्यात सांगितले आहे

या कार्यालयात वनक्षेत्र पाल व वनपाल ही दोन पदे आहेत यातील वनपाल हे सिरसाळा या ठिकाणी राहतात त्यांनी तेथे ध्वजारोहण केले तर वनक्षेत्रपाल यांनी कार्यालयात कसली सुविधा नसल्याने कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या इंग्लिश स्कूल मध्ये ध्वजारोहण केले आहे परंतु कार्यालयात ध्वजारोहण केले नसल्याने याची चर्चा धारूर मध्ये हे वणव्यासारखी पसरली आहे आता या घटनेमध्ये प्रशासन पुढील कारवाई काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Most Popular

error: Content is protected !!