बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात 27 दिवस पावसाने दडी मारली. पावसाअभावी सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. विमा कंपनीने 16 मंडळांसाठीच 25 टक्के अग्रीम मंजूर केला. हा निर्णय अन्यायकारक असून सरसगट शेतकर्यांना 25 टक्क्याचा लाभ द्यावा या प्रमुख मागणीसाठी आज शेतकरी समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनामध्ये सर्वच राजकीय पक्ष कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा यासह इतर घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता. भर पावसामध्ये शेतकर्यांसाठी लोकप्रतिनिधींचे आंदोलन सुरू होते. (पान 7 वर)
बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी सर्वात जास्त सोयाबीन पिकाची लागवड झाली. ऑगस्ट महिन्यामध्ये फक्त तीन दिवस पाऊस पडला. 27 दिवस पावसाने दडी मारली होती. पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन पिकाचं बरच नुकसान झालं. विमा कंपनीने 16 मंडळांसाठी 25 टक्क्याचा अग्रीम मंजूर केला. मात्र हा निर्णय इतर शेतकर्यांवर अन्याय करणारा आहे. सरसगट शेतकर्यांना 25 यक्क्याचा लाभ द्यावा यासाठी तीन दिवसांपूर्वी आ. प्रकाश सोळंके यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजीत केली होती. या बैठकीमध्ये आंदोलन करण्याची दिशा ठरवण्यात आली. आज पहिलं आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येत आहे. महाधरणे आंदोलनामध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या वेळी आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, काँगग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, विजयसिंह पंडित, अशोक हिंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, अशोक डक,मोहन जाधव, पृथ्वीराज साठे, भारत जगताप, उद्धव घोडके, कुलदीप करपे, धनंजय गुंदेकर आदी लोकप्रतिनिधींसह शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
धनुची चिंगारी आंदोलनाची ज्वाला
आंबेसावळी या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबियात जन्मलेल्या धनंजय गुंदेकर या तरुणाने शेतकर्यांसाठी 2020 पासून आंदोलनाला सुरुवात केली. 2020 चा पिक विमा मिळावा यासाठी 54 गावात पहिले आंदोलन केले. या आंदोलनाचा इफेक्ट 2021 चा पिक विम्याचा पहिला टप्पा भेटला. त्यानंतर 123 गावांमध्ये शेतकर्यांचे उपोषण करण्यात आले. त्या उपोषणामुळे 2021 च्या पिक विम्याचा उर्वरित टप्पा मिळाला. त्यानंतर 2022 च्या मे महिन्यात धनंजय्या नेतृत्वाखाली आसुड मोर्चा काढण्यात आला. शेतकर्यांच्या पिक विम्याच्या हक्काच्या मागणीसाठी धनंजयने जी चिंगारी टाकली होती त्याची आज ज्वाला होताना दिसून येते. शेतकर्यांसाठी हा तरुण जसा पोटतिडकीने लढतो तसे लोकप्रतिनिधींनीही लढावं. धनंजयसह शेतकरी नेत्यांना पीक विम्याबाबतचे टेक्नीकल ज्ञान पुरेपूर आहे, म्हणूनच हा लढा उभारला गेला आणि त्याला यश येत गेले.भाजपाच्या लोकप्रतिनिधींना शेतकर्यांचं देणंघेणं आहे की नाही?
सरसकट शेतकर्यांना 25 टक्के अग्रीम देण्यात यावे या मागणीसाठी सर्व पक्ष एकत्रीत येत शेतकर्यांना न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर उतरलेले असताना बीड जिल्ह्यातील भाजपाच्या नेत्यांना, लोकप्रतिनिधींना शेतकर्यांचे देणेघेणे नसल्याचे आज दिसून आले. भाजपाचा साधा कार्यकर्ताही या महत्वपुर्ण आंदोलनामध्ये उपस्थित नव्हता. विशेष म्हणजे भाजपाचे तीन आमदार, जिल्हाध्यक्ष आणि आजी-माजीसह खासदार बीड जिल्ह्यात आहेत.