Monday, January 24, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईधनंजय मुंडेंच्या जनता दरबारास अभूतपूर्व गर्दी, जनतेचा विश्वास कायम!

धनंजय मुंडेंच्या जनता दरबारास अभूतपूर्व गर्दी, जनतेचा विश्वास कायम!


मुंबई (रिपोर्टर)- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या जनता दरबारात अभूतपूर्व गर्दी दिसून येत असून, आपले प्रश्न मार्गी लागण्याचा नेहमीचा विश्वास व मुंडेंचा थेट जनसंपर्क सिद्ध होताना स्पष्ट होत आहे. जनता दरबारात वाढत असलेली गर्दी मुंडेंच्या लोकसिद्धतेची ग्वाही देताना दिसत आहे.
मुंबईच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पक्षाच्या मंत्र्यांना जनता दरबार घेण्याचे नेमून दिले आहे. त्या नुसार मुंडे हे दर गुरूवारी २ ते ४ या वेळात पक्ष कार्यालयात जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेला भेटत असतात. आज (गुरुवार दि. २८) दुपारी जनता दरबारात धनंजय मुंडे दोन तीन तास रमले, यावेळी, अनेक महिला भगिनी, दिव्यांग बांधव मोठ्या आशेने मुंडे यांच्याकडे आपले प्रश्न मांडताना व तितक्याच तत्परतेने धनंजय मुंडे आलेल्या लोकांचे प्रश्न सोडवताना दिसून आले. सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंच्या जनता दरबारास बर्‍याचदा विविध प्रकारातील दिव्यांग व्यक्ती आपले प्रश्न घेऊन येतात, दिव्यांग व्यक्तीला आपली अडचण मांडायला जनता दरबारात पोहोचता येत नाही हे लक्षात येताच स्वतः धनंजय मुंडे उठुन संबंधित व्यक्तीकडे जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेताना दिसल्याने अनेकांना नवल वाटले!
काम घेऊन आलेला व्यक्ती भेटला तिथेच त्याचे काम मार्गी लावणे, हे धनंजय मुंडे यांच्या जनता दरबाराचे वैशिष्ट्‌य! मागील काही दिवसात विविध खोट्या नाट्या आरोपांनी अडचणीत आलेल्या धनंजय मुंडे यांनी अगदी ज्या दिवशी आरोप झाले त्या दिवशी सुद्धा जनता दरबार उपक्रमास खंड पडू दिला नव्हता. एकूणच धनंजय मुंडे यांचा जनता दरबार आता अनेकांना आश्वासक ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे. आजही पक्ष कार्यालयात राज्यभरातुन आलेल्या असंख्य नागरिकांना मुंडे भेटले व त्यांच्या समस्या सोडवल्या.

Most Popular

error: Content is protected !!