Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeक्राईमएसपीच्या पथकाची जुगार अड्‌ड्यावर धाड २० जण ताब्यात; ७ लाख ५० हजाराचा...

एसपीच्या पथकाची जुगार अड्‌ड्यावर धाड २० जण ताब्यात; ७ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त


बीड (रिपोर्टर)- युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील केकतसारणी येथे पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांच्या विशेेष पथकाने जुगार अड्‌ड्यावर धाड टाकत २० जुगार्‍यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नगदी १ लाख २१ हजार ५७० रुपयांसह ५ लाख ४० हजार रुपयांचे वाहने व ८८ हजार रुपयांचे मोबाईल असा एकूण ७ लाख ५० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
केकतसारणी येथे अवैध धंदे सुरू अस्याची माहिती एसपींच्या पथकाला मिळाल्यानंतर त्या ठिकाणी एपीआय विलास हजारे यांच्यासह कर्मचार्‍यांनी धाड टाकली असता रामधन करंडे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये झन्नामन्ना नावाचा जुगार सुरू होता. या वेळी जुगारी राजाभाऊ रामलिंगराव आकुसकर (रा. आडस ता. केज), बाळासाहेब सीताराम राऊत (रा. चिंचोलीमाळी), लहु घनशाम वाघमारे (रा. आडस), किसन पांडुरंग जाधवर (रा. रत्नापूर ता. कळंब), महादेव पांडुरंग मस्के (रा. भीमनगर ता.केज), श्रीराम मधुकर केकाण (रा. केकाणवाडी), अमोल रघुनाथ शेप (रा. लाडेवडगाव), बालासाहेब सुखदेव गालफाडे (रा. चिंचोलीमाळी), बाजीराव परिक्षीत अंडील (रा. पहाडीपारगाव ता. धारूर), सय्यद कलीम अहमद (रा. अजिजपुरा केज), शिलवंत ळीराम शिंदे (रा. लाडेवडगाव), सुरेश प्रल्हाद माने (ब्राह्मणपुर ता. बीड), संतोष कचरू येवले (रा. मादळमोही ता. गेवराई), अरुण विठ्ठल माने (ब्राह्मणपूर), शेख कलीम नूर महंमद (रा. कोरडगाव ता. पाथर्डी जि. नगर), दिलीप दामोधर खरचन (रा. आखेगाव ता. शेवगाव जि. नगर), विष्णू पांडुरंग डोले (रा. मराठा गल्ली, केज), गोरख रामराव पायबसे (रा. कासारी), अशोक शिवाजी उजगरे (रा. आसरडोह), चरणदास महादेव काळे (रा. उमरद पारगाव) असे ताब्यात घेतलेल्या जुगार्‍यांचे नाव आहे. सदरील कारवाई काल दुपारी करण्यात आली. या प्रकरणी युसुफवडगाव पोलिसात जुगार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!