बीड (रिपोर्टर) तलाठी व तहसीलदाराने बोगस फेरफार केला असून तो रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका शेतकर्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले.
सुरेश उफाळे (रा. रेवली ता. परळी) या शेतकर्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत आहे. चुकीच्या पद्धतीने फेरफार करण्यात आल्याचा आरोप उफाळे यांचा असून या बाबत त्यांनी अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत. तहसीलदाराने चुकीचा फेर वळला तो रद्द करावा यासाठी सुरेश उफाळे यांनी आज मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.