मुंबई (रिपोर्टर) शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाल्यानंतर दुसरा कधी होणार? असा प्रश्न उपस्थत होत असून दसर्याच्या मुहूर्तावर दुसर्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये कुणा कुणाची वर्णी लागणार याबाबत आणखी माहिती स्पष्ट झालेली नाही.
30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला. दुसरा विस्तार कधी होणार? अशी चर्चा होत असतानाच दुसर्या विस्ताराचं मुहूर्त दसर्याला काढले असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसर्या मंत्रिमंडळ विस्तारा कुणाची वर्णी लागणार याबाबत अधिकृत सांगितलेले नाही.