बीडच्या ऊसतोड कामगारांचा पुण्यात एल्गार
ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी करा यासाठी पुण्यात साखर आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा
बीड (रिपोर्टर) महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटना सिटूच्या वतीने ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी करावी तसेच वाहन मालक, मुकादम, कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी पुणे साखर आयुक्त कार्यालयावर आज डॉ.डी.एल.कराड, सुभाष जाधव, दत्ता डाके, अजय बुरांडे, मोहन जाधव यांच्या नेतृत्वाखालील धडक मोर्चा काढण्यात आला. बीड जिल्ह्यासह राज्यातील हजारो ऊसतोड कामगार या मोर्चात सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या पुणे येथील मुख्य कार्यालयाचे 3 एप्रिल 2022 रोजी उद्घाटन करण्यात आले. विशेषता तातडीने या सर्व कामगारांच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी 80 निवासी वस्तीग्रह, आश्रम शाळा सुरू करण्याचे नियोजन जाहीर केले. परंतु याबाबत अंमलबजावणी झाली नाही हे आजचे वास्तव आहे. या महामंडळाच्या सर्व सेवा सुविधा ऊसतोडणी कामगार, गाडीवान, मुकादम व ऊस वाहतूकदार यांना हंगामापूर्वी लागू कराव्यात. ऊसतोड कामगार, वाहन मालक, मुकादम यांच्या कारखान्याकडे असलेल्या थकीत रखमा त्वरित मिळाव्या. यासाठी आज 20 सप्टेंबर रोजी साखर आयुक्त कार्यालय साखर पुणे येथे न्याय मागण्यासाठी धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नामदेव राठोड, आबासाहेब चौगुले, डॉ.ज्ञानेश्वर मोटे, दत्ता डाके, मोहन जाधव, सुदाम शिंदे, अजय बुरांडे, अशोक राठोड, मनिषा करपे, ओम पुरी, अंगद खरात, वसंत पवार, विनोद गोंविदवार, विजय राठोड, विनायक राठोड, मधुकर आडागळे, अनिल राठोड, सुभाष राठोड, राजू ईबीते, राजू राठोड, भारत राठोड, नवनाथ कोल्हे आदी उपस्थित होते.