Friday, March 5, 2021
No menu items!
Home बीड इंग्रजी माध्यमांच्या शाळा नोंदणी व दुरुस्ती आरटीई पोर्टलवर करा -मनोज जाधव

इंग्रजी माध्यमांच्या शाळा नोंदणी व दुरुस्ती आरटीई पोर्टलवर करा -मनोज जाधव


जि.प. मुख्य कार्यकारीअधिकारी यांना निवेदन; नोंद न करणार्‍या शाळांची मान्यता रद्द करा
बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या मोठ्या प्रमाणत आहे. या शाळा विनाअनुदानित तत्त्वावर सुरू आहेत. या शाळांना आपली नोंद आरटीई पोर्टलवर करून शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे बंधनकारक आहे. मात्र आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश देण्यापासून पळवाट काढण्यासाठी बर्‍याचश्या शाळा आरटीई पोर्टलवर आपल्या शाळांची नोंद करत नाहीत. त्यामुळे अश्या नोंद नकरणार्‍या शाळेत इच्छा असताना देखील विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहवे लागत आहे. हा प्रकार शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन करणारा आहे. त्यामुळे नोंद नकरणार्‍या शाळांची मान्यता रद्द करण्यात यावी. अशी मागणी शिवसंग्रामचे नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी निवेदना द्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे केली आहे. इंग्रजी माध्यमांच्या (अल्पसंख्यांक शाळा वगळून) सर्व शाळांची नोदणी आरटीई पोर्टलवर करण्यात यावी. शैक्षणिक वर्ष २०२० – २१ मध्ये जिल्ह्यात फक्त २२९ शाळांची नोदणी ही आरटीई पोर्टल वर करण्यात आली होती. त्यातही काही मराठी शाळांचा समवेश होता.त्या मुळे या वर्षी अल्पसंख्यांक शाळा वगळता बाकी सर्व शाळांचे आरटीई पोर्टलवर नोदणी व्हावी. जेणेकरून शाळांची संख्या वाढेल आणि शाळांची संख्या वाढल्यामुळे प्रवेशाच्या जागेत देखील वाढ होईल. यामुळे शिक्षण हक्क कायद्या आरटीई अंतर्गत जास्तीत जास्त आर्थिक दुर्बल, वंचित व गोर – गरीब विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या संधी मिळतील. तसेच काही शाळा एका शाळेची मान्यता घेऊन त्या नावा खाली दोन – चार शाळा चालवतात. अश्या शाळांनी आरटीई पोर्टलवर नोंद केल्या आहेत परंतु एका मान्यतेवर आपल्या शाळांच्या दोन,तीन किंवा चार शाखा चालवतात अश्या शाळांच्या सर्व शाखाची नोदणी होणे गरजेचे आहे.
कागदोपत्री शाळा दाखवून शासनाचा निधी लाटण्याचा प्रयत्न होत आहे. शासनाकडून आरटीई अंतर्गत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांच्या फी प्रतिपूर्ती दिली जाते. या शासनाच्या पैष्यावर डल्ला मारण्यासाठी काही शाळां बोगस विद्यार्थी दाखवून फक्त कागदोपत्री शाळा सुरू ठेवल्या आहेत.अश्या शाळांची तत्काळ मान्यता रद्द करून त्या आरटीई पोर्टल वरून कमी करण्यात याव्यात. शाळांचे चुकीचे पत्ते (रववीशीी)दुरुस्त करून योग्य पत्ते (रववीशीी) नोंदवण्यात यावेत आरटीई प्रवेश प्रक्रिया ही गूगल मॅपिंग आधारित आहे. काही शाळांनी आपल्या शाळा स्थलांतरित केल्या आहेत.तर काही शाळा एकाच मान्यतेवर दोन शाळा चालवतात अश्या शाळा एकच पत्ता दर्शवित आहेत .यामुळे प्रवेश प्रक्रियेत मोठा गोंधळ निर्माण होत आहे. त्यामुळे शाळा ज्या ठिकाणी ज्या जागेवर सुरू आहेत त्याच ठिकाणचा पत्ता आरटीई पोर्टलवर असणे गरजेचे आहे. अशा चुकीच्या पत्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी. वरील सर्व बाबींचा विचार करून आरटीई पोर्टलवर इंग्रजी माध्यमांच्या सर्व शाळांची नोंदणी व दुरुस्ती करून घ्यावी अशा सूचना संबंधित अधिकारी-कर्मचारी यांना देऊन जास्तीत जास्त गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळून द्यावा ही मागणी निवेदनात मनोज जाधव यांनी केली आहे.

Most Popular

जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने मृत्यूचे दार उघडले

आज चौघांचा तर तिन दिवसात सात बाधितांचा मृत्यूबीड (रिपोर्टर):- बीड शहरासह जिल्ह्यात कोरोना पुन्हा हातपाय पसरताना दिसून येत असून रोज कोरोना बाधीत...

महिलेच्या गळ्यातील गंठण पळविले

बीड (रिपोर्टर)- काल नवगण राजुरी येथील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातील अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन दीड तोळ्याचे गंठण लंपास...

तेल खावे की नाही? खाद्य तेल पावणे दोनशावर गेले

बीड (रिपोर्टर):- पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे दोन दिवसाला भाव वाढत आहेत. या भाववाढीमुळे वाहन धारक चांगलेच अडचणीत सापडले असतांना खाद्य तेलाचे भावही गगनाला...

परमिट एकाचे, माल दुसर्‍याकडे ! बोरफडीच्या ग्रामस्थांनी अडवला टेम्पो

तहसीलदारासह पुरवठा विभागाचे संगनमत उघडग्रामस्थांनाच धमकावलं तहसीलदारांनीखमक्या ग्रामस्थांमुळे काळाबाजार थांबलाबीड (रिपोर्टर)- पुरवठा विभागाच्या संगनमताने जिल्ह्यात राशनवरील धान्याचा सर्रासपणे काळाबाजार होत असल्याचे समोर...