आष्टी(रिपोर्टर): आ. सुरेश धस यांचा ५१ वा वाढदिवस उद्या दि.२ फेब्रुवारी रोजी असून वाढदिवसानिमित्त आष्टी विधानसभा मतदार संघात विविध सामाजिक, सांस्कृतिक , शैक्षणिक, रक्तदान, आरोग्य तपासणी,क्रीडा कार्यक्रमाचे भरगच्च आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छानिमित्त पुष्पगुच्छ हार – तुरे, फेटे, बुके नव्हे तर बुक स्विकारले जाणार आहेत.
बीड – लातूर- उस्मानाबाद विधानपरिषदेचे आ. सुरेश धस यांचा ५१ वाढदिवस उद्या मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त मतदार संघात विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.दरवर्षी प्रमाणे कुसळंब येथे आण्णा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये सांस्कृतिक,समाजप्रबोधनकार ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांचे किर्तन, कबड्डी स्पर्धा, आरोग्य शिबीर,रक्तदान शिबीर, आण्णा हेल्थ क्लब शुभारंभ,तर आष्टी येथे लावणी महोत्सव,टेनिस बॉल स्पर्धा, रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप, अनाथलयातील मुलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप अशा सामाजिक उपक्रमाचे मतदार संघात अनेक ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते हितचिंतकांनी बुके न आणता शालेय विद्यार्थी तसेच गोरगरिबांना बुक द्यावेत जेणेकरून तुम्ही दिलेले पुस्तक वाचल्यानंतर एखाद्याच्या जिवणात बदल घडेल असे आवाहन करण्यात आले आहे.