सोळंके कारखान्याकडून अडीच लाख रूपयांची मदत
माजलगाव (रिपोर्टर) माजलगाव धरणात मदतकार्यासाठी आलेल्या कोल्हापूर येथील केडीआरएङ्गचे जवान राजशेखर मोर यांचा धरणात मृत्यु झाला. त्यांच्या पश्चात असणा-या गरीब कुटूंबीयांसाठी माजलगाव पत्रकार संघ, रोटरी क्लब, व्यापारी महासंघ यांच्या वतीने एक हात मदतीचा फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीमध्ये माजलगावकरांनी उत्स्ङ्गुर्त सहभाग घेत सढळ हाताने मदत करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान दुपारपर्यंत अंदाजे दहा लाख रूपये जमा झाले होते.
डॉ. फपाळ यांचा धरणात बुडालेला मृतदेह शोधण्यासाठी कोल्हापुरी येथुन केडीआरएङ्गचे जवान राजशेखर मोरे हे आले होते परंतु मच्छीमारांच्या जाळ्यात अडकुन त्यांचा मृत्यु झाल्याची -हदयद्रावक घटना घडली होती. मोरे यांच्या पश्चात असलेल्या त्यांच्या पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व आई, वडीलांचा आधार हरवला. त्यामुळे गरिब कुटूंबीयांच्या मदतीसाठी माजलगाव पत्रकार संघ, रोटरी क्लब, व्यापारी महासंघाने पुढाकार घेत एक हात मदतीचा मदतङ्गेरी शहरातुन आज दि. 21 सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजी महाराज चौकात जवान चंद्रशेखर मोरे यांना श्रध्दांजली अर्पण करून फेरीची सुरूवात करण्यात आली. या ङ्गेरीत उत्स्ङ्गुर्तपणे सहभाग घेत माजलगावकरांनी सढळ हाताने मदत केली. यावेळी आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार मोहनराव सोळंके, राधाकृष्ण होके पाटील, बाबुराव पोटभरे, जयसिंह सोळंके, कवि प्रभाकर साळेगावकर, डॉ. सुशिल लोढा, रोटरीच्या अध्यक्षा डॉ. अर्चना पवार, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासणी, सरपंच रूपाली कचरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश मोगरेकर, जिल्हाध्यक्ष तुकाराम येवले, सचिव दिनकर शिंदे, उपविभागीय अधिकारी निलम बाङ्गना, तहसिलदार वर्षा मनाळे, तलाठी रूपचंद आभारे, प्रा. स्नेहल पाठक, बी. एन. कुलकर्णी, दत्ता काळे, डॉ. उध्दव नाईकनवरे, यांची उपस्थिती होती.
असा आला मदतीचा ओघ
लोकनेते सुंदरराव सोळंके साखर कारखाना – 251000.
आमदार प्रकाश सोळंके वैयक्तिक – 111000.
जयसिंह सोळंके – 101000.
मोहन जगताप – 51000.
राजेशिवाजी गणेश मंडळ – 51000.
टेंबे गणेश मंडळ – 21000.
संघमित्रा अर्बन व मोगरा ग्रामस्थ. – 26017.
तुळजाभवानी अर्बन – 51000.
रमेश आडसकर – 51000.
सोळंके महाविद्यालय – 31000.
पंचायत समिती ग्रामसेवक संघटना – 41000.
बाबुराव पोटभरे – 25000.
विटभट्टी युनियन – 21000.
दोन्ही जलतरण मित्र मंडळ – 100000.
दोन्ही रोटरी क्लब ऑङ्ग माजलगाव – 75000.
अॅड. बी. आर. डक – 21000.
कल्याण आबुज – 21000.
दिपक मेंडके – 11000.
अभय होके – 11000.
शेख मंजुर – 11000.
मी शास
नाकडुन सर्वोतोपरी मदत करण्यासाठी पुढाकार घेणार असुन शहीद जवान राजशेखर मोरे यांच्या कुटूंबीयांसाठी दहा लाख रूपयांची मदत करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचेकडे केली आहे.
–प्रकाश सोळंके, आमदार.