नवी दिल्ली (वृत्तसेवा): सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठासमोरील खटल्यांची सुनावणी लाईव्ह करण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात 27 सप्टेंबरपासून होणार आहे. सुरुवातीला हे लाईव्ह टेलिकास्ट युट्यूबवर होणार आहे आणि नंतर सर्वोच्च न्यायालय लाईव्ह स्ट्रिमिंगसाठी स्वतःचा प्लॅटङ्गॉर्म विकसित करणार आहे. ‘बार अँड बेंच’ने याबाबत वृत्त दिलं आहे.
नावणी लाईव्ह करण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात 27 सप्टेंबरपासून होणार आहे. सुरुवातीला हे लाईव्ह टेलिकास्ट युट्यूबवर होणार आहे आणि नंतर सर्वोच्च न्यायालय लाईव्ह स्ट्रिमिंगसाठी स्वतःचा प्लॅटङ्गॉर्म विकसित करणार आहे. ‘बार अँड बेंच’ने याबाबत वृत्त दिलं आहे.घटनापीठासमोरील या खटल्यांच्या लाईव्ह सुनावणीचा निर्णय सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘ङ्गूल कोर्ट मीटिंग’मध्ये घेण्यात आला. ऑक्टोबर महिन्यात ‘या’ 5 राशीच्या लोकांना होऊ शकतो बक्कळ धनलाभ, बनत आहे विशेष योगायोग; जाणून घ्या या भाग्यवान राशींबद्दल म्हणून शिवाजी पार्कवर भाषण करण्यास गुलाबराव पाटलांवर बंदी घातली एकनाथ शिंदेंचा खुलासा, म्हणाले सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदा माजी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या निवृत्तीवेळी लाईव्ह स्ट्रिमिंग केलं होतं. त्यावेळी ते नॅशनल इन्ङ्गॉर्मेटिंक्स सेंटर या सरकारी संस्थेच्या संकेतस्थळावर दाखवण्यात आलं होतं.सर्वोच्च न्यायालयाने 13 दिवसांत निकाली काढली पाच हजार प्रकरणंदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश उदय लळित यांनी पदभार स्वीकारल्यानंतर न्यायालयातील पेंडीग प्रकरणं निकाली काढण्याचा सपाटा लावला आहे. त्यांनी अवघ्या 13 दिवसांत पाच हजारांच्यावर प्रकरणं निकाली काढली आहेत.बार अँण्ड बेंच या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने गेल्या 13 दिवसांत एकूण 5113 प्रकरणं निकाली काढली आहेत. यामध्ये 283 नियमित, 1212 हस्तांतरण केलेल्या तर 3618 अन्य प्रकरणांचा समावेश आहे. ही प्रकरणं निकाली काढण्यासाठी नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश उदय लळित या पदभार स्वीकारल्यानंतर न्यायप्रक्रियेत जे बदल केलेत त्यापैकी हा एक बदल आहे.