नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी अथक प्रयत्न केले. ते म्हणायचे, रेल्वेने दिल्लीला जायचं, या भागातले रस्ते करायचेत, जलसंधारणाचे कामे करायचेत, त्यांच्या काळामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर निधी जिल्ह्यासाठी आणला. दुर्दैवाने साहेब आपल्यातून गेले. ते नसले तरी ते प्रत्येकाच्या हृदयात सोबत आहेत. साहेब गेल्यानंतर पहिली बैठक फडणवीसांनी घेतली आणि तेथून रेल्वेच्या कामाला वेग आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा प्रचार सभेला आले होते तेव्हा ते म्
हणाले होते, स्व. मुंडेंचं स्वप्न साकार करेल,
बीडच्या रेल्वेचे श्रेय हे मोदींनाच जाते. मी कुठेही, कधीही
साहेबांचं नाव द्या, असं म्हणणार नाही. ते प्रत्येकाच्या
हृदयात आहेत, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.