Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeकोरोनाएसपीच्या विशेष पथकाची वाळू माफीयांवर कारवाई चार ट्रॅक्टर दोन जेसीबी जप्त

एसपीच्या विशेष पथकाची वाळू माफीयांवर कारवाई चार ट्रॅक्टर दोन जेसीबी जप्त


बीड (रिपोर्टर)ः- जिल्ह्यात अवैध धंदे जोमात सुरू असून ते बंद करण्यासाठी पोलीस अधिक्षक राजारामा स्वामी यांच्या विशेष पथकाने धाड सत्र मोहीम सुरू केली आहे. गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील मटका, गुटखा यासह वाळू माफीयांवर कारवाईचा बडगा उगरला जात आहे. काल विशेष पथकातील एपीआय विलास हजारे यांनी आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिना नदी पात्रात धाड टाकून अवैध वाळू वाहतूक आणि उपसा करणारे चार ट्रक्टर, दोन जेसीबीसह एकुण ४७ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.


जिल्ह्यात वाळूचा एकही ठेका नसतांना सर्रासपणे नदी पात्रातील अवैध वाळू उपसा होत आहे. स्थानीक पोलीसांना व बीट अमलदारांना यातील खडा ना खडा माहित असतांनाही खुलेआम वाळू उपसा होत आहे. आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टाकळसिंगी गावाजवळील सिना नदी पात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती एस.पी.च्या विशेष पथकाला मिळाल्यानंतर पथक प्रमुख एपीआय विलास हजारे यांनी काल सायंकाळी तेथे धाड टाकली. यावेळी चार ट्रक्टर त्यामध्ये तिन ब्रास वाळू त्याची किम्मत २४ लाख ४५ हजार रुपये व दोन जेसीबी त्याची किम्मत २३ लाख रुपये असा ऐकूण मुद्देमाल ४७ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

यावेळी बाळू तुकाराम देवकते, वय-२३ वर्षे, व्यवसाय -जेसीबी चालक रा.टाकळसिंगी, ता.आष्टी. सुभाष बाळासाहेब वालेकर वय-३२ वर्षे, व्यवसाय-जेसीबी चालक, रा. देवीगव्हाण ता.आष्टी, श्रीराम ज्ञानदेव जगताप, टॅक्टर चालक रा.टाकळसिंगी, गणेश सुनील श्रीगंधे टॅक्टर चालक, रा.हिंगणी,यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. तर जेसीबी व अन्य एक टॅक्टर चालक फरार झाला आहे. आष्टी पोलीस ठाण्यात कलम ३७९, १०९, ५११ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक कोरडे हे करत आहे.

Most Popular

error: Content is protected !!