गेवराई : (रिपोर्टर) शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा यासाठी गेवराई शहरातील सर्व धर्मीय नागरिकांच्या वतीने मागील काही दिवसांपासून अनेक बैठका संपन्न झाल्या होत्या. यामध्ये गेवराई शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील शिवप्रेमींनी या स्मारकाच्या मागणीसाठी सह्यांच्या मोहिम हाती घेत ११ हजार सह्या घेतल्या आहेत.
दरम्यान आज याच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या मागणीसाठी कृती समितीच्या वतीने ११ सह्यांसोबतच अनेक ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन गेवराई शहरात सर्वधर्मीय भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व धर्मीय बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. सकाळी ११ वा. (पान ७ वर)
दिनांक २७ छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेली ही भव्य रॅली शास्त्री चौक, बेदरे गल्ली, मेन रोड, चिंतेश्वर गल्ली या मिरवणूक मार्गाने तहसिल कार्यालयावर धडकली या ठिकाणी काही ठराविक बांधवांनी उपस्थितांना संबोधित केले व यानंतर स्मारक कृती समितीच्या वतीने तहसीलदार सचिनजी खाडे यांना आपले निवेदन व सोबत ११ हजार सह्याचा संच देऊन या स्मारका बाबत आपली ही मागणी सर्व माहितीसह प्रशासनाकडे पाठवावी अशी विनंती केली. या रॅलीत मोठ्या संख्येने सर्व धर्मीय नागरिक, व्यापारी, डॉक्टर, वकील, विविध पक्ष संघटना यांच्यासह अनेकांनी विशेष सहभाग नोंदवला होता. यावेळी मुस्लिम बांधवांच्या वतीने रॅलीत सहभागी असलेल्या बांधवांना केळी व पाण्याचे वाटप करण्यात आले.