बीड (रिपोर्टर)- काल बीड जिल्ह्यातून ५३६ संशयितांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ५०३ जण निगेटिव्ह आले असून ३३ नव्या रुग्णांची भर पडली आहे तर दिवसभरात जिल्ह्यातील ३० कोरोना रुग्णांनी कोरोवार मात केलीअसून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यातून एकूण १७ हजार ९८३ जण पॉझिटिव्ह आले असून त्यापैकी १७ हजार २१५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
आरोग्य विभागाला आज ५३६ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये ५०३ जण निगेटिव्ह आढळून आले असून ३३ जण बाधीत आढळून आले आहेत. बाधितांमध्ये सर्वाधिक जास्त रुग्ण हे बीड तालुक्यातील असून ते २१ आहेत. त्यापाठोपाठ अंबाजोगाईचे ३, परळी, केज, आष्टीमध्ये प्रत्येकी २ रुग्ण आढळून आले आहे तर धारूर, गेवराई आणि वडवणी तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.