बीड /धारूर/गेवराई (रिपोर्टर)- वीज वितरण कंपनीने थकीत बिलासाठी वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतल्याने याच्या निषेधार्थ भाजपाने आज राज्यभरात टाळे ठोको आंदोलन हाती घेतले. बीड जिल्ह्यातही भाजपाने आंदोलन केले. गेवराई येथे आ. लक्ष्मण पवार यांच्या उपस्थितीत वीज वितरण कार्यालयाला टाळे लावण्यात आले. बीड येथे राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले तर धारूर येथे आंदोलन करण्यात आले. इतर तालुक्यातही भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.

महावितरणने राज्यभरात ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस बजावली आहे. इतके मोठे कनेक्शन वीज वितरण कंपनीने तोडल्यास अनेकांना अंधारात राहावे लागणार आहे. या वीज कंपनीच्या निषेधार्थ भाजपाने राज्यभरात टाळे ठोको आंदोलन केले. बीड जिल्ह्यातही भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले असून गेवराई येथील आ. लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कार्यालयाला कुलूप लावण्यात आले आहे.

या वेळी पांडुरंग थळगे, प्रकाश सुरवसे, दीपक सुरवसे, संदीप लगड यांच्यासह आदींची उपस्थिती होती. बीड शहरात जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी भगीरथ बियाणी, नागरगोजे, चंद्रकांत फड, लक्ष्मण जाधव, डोरले, अनिल चांदणे यांच्यासह आदी कार्यकर्त्यांची उपस्तिती होती. धारूर येथेही भाजपा कार्यकर्त्यांनी वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य ओव्हाळ,भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा नगराध्यक्ष डॉक्टर स्वरूपसिंह हजारी , तालुका अध्यक्ष चोले , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव बडे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, ड मोहन भोसले ज्ञानोबा चोले नगरसेवक सुखाराम गायसमुद्रे व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्ह्यातील इतर तालुक्यात भाजपाने वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलन करून वीज वितरण कार्यालयाचा निषेध केला.