अन्वर यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ
बीड (रिपोर्टर) पोलीस दलामध्ये कार्यरत असणार्या शेख अन्वर अब्दुल रऊफ यांना रात्री ड्युटीवर असतांना मेंदुचा तिव्र झटका आल्याने यामध्ये त्यांचे दु:खद निधन झाले. त्यांच्या या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर आज दुपारी नमाज नंतर शहेंशाहवली दर्गा कब्रस्तान येथे शासकीय इतमामात अंन्त्यसंस्कार करण्यात येणार आहे.
शेख अन्वर हे पोलीस दलात दंगल नियंत्रण पथकात नियूक्त होते. रात्री शहेंशाहवली दर्गाची संदल मिरवणूक निघाली होती, त्याच्या बंदोबस्तासाठी ते ड्यूटी बजावत होते. 10 च्या सुमारास ड्युटीवर असतांनाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या या अकाली निधनाने पोलीस दलासह शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेख अन्वर हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांचा शहरात मोठा मित्र परिवार होता. त्यांच्या पार्थीवदेहावर आज दुपारी शहेंशाहवली दर्गा कब्रस्तान या ठिकाणी नमाजनंतर शासकीय इतमामात दफनविधी करण्यात येणार आहे. शेख अन्वर यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.