माजलगाव (रिपोर्टर) माजलगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचगव्हाण येथून पत्रकाराची चारचाकी रात्री लंपास केल्याची घटना घडली असून या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया दुपारी सुरू होती.
पत्रकार सुहास सावंत यांनी आपली स्विफ्ट डिझायर (क्र. एम.एच. ४४. एस. ७४७४) ही आपल्या चिंचगव्हाण येथील घरासमोर रात्री लावली होती. आज सकाळी ती लावलेल्या ठिकाणी नसल्याने कोणीतरी चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी या प्रकरणी माजलगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून दुपारी उशीरापर्यंत अज्ञातावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.