• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

धक्कादायक : भगीरथ बियाणींनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली गोळी डोक्यातच, दुर्दैवी मृत्यू; घटनास्थळी जिल्हा पोलीस अधिक्षक

by Beed Reporter
October 11, 2022
Reading Time: 1 min read
0
धक्कादायक : भगीरथ बियाणींनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली गोळी डोक्यातच, दुर्दैवी मृत्यू; घटनास्थळी जिल्हा पोलीस अधिक्षक
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

धक्कादायक : भगीरथ बियाणींनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली
गोळी डोक्यातच, दुर्दैवी मृत्यू; घटनास्थळी जिल्हा पोलीस अधिक्षक
सिटीस्कॅननंतर शवविच्छेदन, आत्महत्येचे कारण अद्याप समोर नाही;

शांत, संयमी, कर्तव्यदक्ष कार्यकर्ता गेल्याचे बीडकरांना दु:ख
बीड (रिपोर्टर) भारतीय जनता पार्टीचे बीड शहर अध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी आज सकाळी स्वत:च्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. भागीरथ बियाणी यांनी आत्महत्या का केली? याबाबत अद्याप अधिकृत माहिती प्राप्त झाली नसली तरी घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर हे पोहचले आहेत. तर दुसरीकडे भागीरथ बियाणी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. डोक्यात झाडून घेण्यात आलेली गोळी बाहेर आली नसल्याने सिटीस्कॅन करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. सदरची धक्कादायक घटना घडल्यानंतर जिल्हा रुग्णालयात भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. बियाणी यांचे सर्वांसोबत चांगले संबंध तर होतेच, स्वभाव मनमिळावू आणि शांत होता. अशा स्थिती भागीरथ बियाणी यांनी आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या बाबत अधिक माहिती असे की, बियाणी कुटुंब हे मूळचे पिंपळनेर येथील असून गेल्या चाळीस वर्षांपासून ते बीड शहरात वास्तव्यास आहेत. दोन भाऊ वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उद्योग धंदे करत असून भागीरथ बियाणी हे उद्योग धंद्याबरोबर सक्रिय राजकारणामध्ये सुरुवातीपासून काम करत आहेत. राजकारणासह समाजकारणाला महत्व देत समाजाबरोबर इतर समाजातील लोकांचे काम करण्यास भगीरथ बियाणी हे सातत्याने पुढे असायचे. आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भगीरथ बियाणी यांनी आपल्या बामणवाडी येथील राहत्या घरी स्वत:च्या पिस्तुलमधून डोक्यात गोळी झाडून घेतली. तशा परिस्थितीत घरच्यांनी तात्काळ त्यांना बीड येथील फिनिक्स रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले मात्र तत्पुर्वीच भगीरथ बियाणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. भगीरथ बियाणी यांच्या मृत्यूची माहिती वार्‍यासारखी शहरात पसरली. शांत स्वभावाच्या सक्रिय कार्यकर्त्याने आत्महत्या केली ही माहितीच ऐकणार्‍यांसाठी धक्कादायक होती. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये आणण्यात आला. रुग्णालयामध्ये मोठया संख्येने भाजपा कार्यकर्त्यांसह बिणयाणी कुटुंबाशी संबंध असलेले अनेक लोक जमा झाले आहेत. भगीरथ यांनी आत्महत्या करण्यासारखं मोठं पाऊल का उचललं? हे अद्याप समजू शकले नाही. त्यांनी झाडून घेतलेली गोळी ही डोक्यातच असल्याने त्यांचे सिटीस्कॅन करण्यात येणार आहे. घटनेचे गांभीर्य पाहून स्वत: जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी अशधी फिनिक्समध्ये भेट दिली तर नंतर ते जातीने घटनास्थळावर पंचनामा करण्यासाठी गेले. या घटनेने बीड शहर सुन्न झाले असून राजकारणातला आणि समाजकारणातला सक्रिय कार्यकर्ता आपल्यातून गेल्याची भावना आज प्रत्येकाला आहे. आत्महत्येचे कारण समोर यावे, अशी भावना प्रत्येकाची आहे. शवविच्छेदनानंतर बियाणी यांचा पार्थीव देह कुटुंबियांना सोपविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नक्की काय झालं?
भगीरथ बियाणी हे रात्री मुंबईसाठी रवाना झाले होते. मात्र ते अर्ध्या रस्त्यातून परत आले. सकाळी सहा ते सातच्या दरम्यान ते परत आल्याचे सांगण्यात येते. आल्यानंतर ते आपल्या तिसर्‍या मजल्यावरील बेडरुममध्ये झोपलेही. सकाळी दहाच्या सुमारास त्यांनी बेडरुममधील बाथरुममध्ये जाऊन स्वत:वर गोळी झाडून घेतली. त्यानंतर याची माहिती घरच्यांना झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल
करण्यात आले.

खा. प्रितम मुंडेंनी बैठक
सोडून दवाखाना गाठला
खा. प्रितम मुंडे या आज बीड शहरात डेरेदाखल होत्या. त्यांची जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्यासोबत बैठक सुरू होती. त्या दरम्यान त्यांना या दुर्दैवी आणि धक्कादायक घटनेची माहिती कळली. त्यांनी तात्काळ आधी फिनिक्स हॉस्पिटल गाठलं आणि नंतर जिल्हा रुग्णालयात आल्या.

Previous Post

नवर्‍याने सुपारी देऊन केला बायकोचा खून; खुनाचे कनेक्शन परळीच्या कन्हेरवाडी पर्यंत

Next Post

चिंचगव्हाणमधून चारचाकी लंपास; शहर पोलिसात तक्रार

संबंधित बातम्या

क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अग्रलेख

अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?

by गणेश सावंत
July 19, 2026
Next Post
चिंचगव्हाणमधून चारचाकी लंपास; शहर पोलिसात तक्रार

चिंचगव्हाणमधून चारचाकी लंपास; शहर पोलिसात तक्रार

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार
  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?