गेवराई : (रिपोर्टर) अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले असून या पिक नुकसानीची पाहणी गुरुवारी पालकमंत्री अतुल सावे यांनी केली . यावेळी बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्व पंचनामे तात्काळ करून सरकारकडे अहवाल सादर करावा अशा सुचना प्रशासनाला त्यांनी दिल्या . बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी गुरुवार दि . १३ ऑक्टोबर रोजी गेवराई येथील अनिल ठाकूर यांच्या शेतात जाऊन नुकसानग्रस्त शेताची पाहणी केली . यावेळी शेतीपिकांचे नुकसान अधिक आहे , त्यामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून घ्या , नुकसानग्रस्त शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या अशा सुचना पालकमंत्री सावे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या . तसेच शेतकऱ्यांनी चिंता करू नये भाजपा व शिंदे सरकार शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचा विश्वास पालकमंत्री अतुल सावे यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिला . यावेळी तहसीलदार सचिन खाडे , कृषी अधिकारी अभय वडकुते , भाजपा जिल्हाध्यक्ष राजेद्र मस्के , उपजिल्हाध्यक्ष दादासाहेब गिरी , मा . उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर , शाम कुंड , देविदास फलके , प्रल्हाद येळापुरे , शेतकरी अनिल ठाकूर , मंडळाधिकारी जितेंद्र लेडाळ , तलाठी पांढरे , सरपंच नंदु गरड आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.