आष्टी ( रिपोर्टर ) :-तालुक्यातील अनेक शेतक-यांचे पिक कर्ज प्रकरणे प्रलंबित असून खरीप हंगाम संपला असून रब्बी हंगाम ही संपला आहे.तरी अद्याप पर्यंत पिक कर्ज प्रकरणे मंजूर न करण्यात आल्याने व बँक कर्मचारी शेतक-यांना अरेरावीची भाषा वापरत आहेत. व्यवस्थित वागणूक देत नाहीत.शेतक-यांचे कर्ज प्रकरणे तात्काळ मंजूर करा यासह शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी मा.आ.भीमराव धोंडे यांनी बँकसमोर कार्यकर्ते व शेतक-यांसह लाक्षणिक उपोषण दि.18 रोजी केले.
तालुक्यातील शेतकर्यांचे पिक कर्ज प्रकरणे आठ दिवसांत तात्काळ मार्गी लावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा मा.आ.भीमराव धोंडे यांनी बँक व्यवस्थापकांना दि.12 रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला होता. शेतकरी बांधवांनी पीक कर्ज प्रकरणे आपल्या शाखेत एक वर्षापासुन सादर केले असून अद्यापपर्यंत मंजूर नाही याबाबत शेतक-यांनी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन अरेरावीची भाषा वापरली जाते तरी शेतकरी व इतर ग्राहकांची प्रलंबित प्रकरणे मंजूर न झाल्याने मा.आ.भीमराव धोंडे यांनी बँके समोर
लाक्षणिक उपोषण केले यावेळी जिल्हा सचिव भाजपा शंकर देशमुख, भाजपा तालुका उपाध्यक्ष रघुनाथ शिंदे,बाबासाहेब गर्जे, संभाजी झांबरे,बाबु कदम,सरपंच सावता ससाणे ,सरपंच संजय नालकोल,सदाशिव गर्जे, संजय काळे, बाबा गर्जे, अशोक मिसाळ, रामनाथ मिसाळ, नामदेव गर्जे, सोन्याबा गावडे, छगन तरटे, अण्णासाहेब लांबडे, सुरेश दराडे, बाबा खलाटे, रावसाहेब कुत्तरवाडे सुदाम झिंजूर्के,सोपान चौधार यासह आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.