गेवराई (रिपोर्टर)- गेवराई मोंढा येथील एका किराणा दुकान मध्ये सुट्टे पाम तेल विक्री करत असल्याचे अन्न प्रशासन सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांना कळाले असता त्यांनी त्यांच्या सहकार्य सह आज रात्री च्या सुमारास शहरातील मोंढा भागात प्रसिद्ध दुकानात धाड टाकत मोठी कारवाई केली.
दिपावली निमित्त मोठ्या प्रमाणात तेलाचे विक्री केली जाते परंतू सुट्टे तेल विक्री न करण्याचे आदेश असतांना देखील जास्त पैसै व तेलात मिलावट करण्याच्या लालचेने दुकानदार सुट्टे तेल विक्री करत असतात व नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता सरास सुट्टे तेल विक्री करत आहेत येथिल मोंढा भागात दि.14 शुक्रवार रोजी सायंकाळी 8 च्या सुमारास एका किराणा दुकात अन्न व भेसळ अधिकार्यांनी मोठी कारवाई केली या कारवाई मध्ये सुट्टे पाम तेल 1500 कि.ग्रा. व सोयबिन तेल 500 कि.ग्रा. सिल केले असुन या मध्ये 2 लाख 32 हजार 500 रुपयाचे तेल सिल करत तपासनी साठी नमुना तेल पाठवण्यात आले असल्याची माहिती अन्नप्रशासन साहय्याक आयुक्त सय्यद इम्रान हाशमी यांनी दिली या कार्यवाही मध्ये अन्नसुरक्षा अधिकारी महेंद्र गायकवाड,नमुना साहय्यक उमेश कांबळे,भास्कर घोडके आदींनी केली.