बीड (रिपोर्टर)ः- शहरातील कै.शिवाजी धांडे नगर रस्त्याची दुरावस्था आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी अनेक वेळा मागणी करण्यात आली. मात्र याची दखल नगर पालिकेने अद्यापही घेतलेली नाही. उपोषणाचा इशारा देण्यात आलेला होता.रात्री अवकाळी पाऊस झाल्याने रस्त्यावर चिखलच चिखल झाला. रस्त्यावरुन पायी चालणे मुश्कील झाले. नगर पालिकेने आता तरी रस्त्याकडे लक्ष दयावे व नागरीकांची गैरसोय दुर करावी अशी माणगी करण्यात आली.
मुक्ता लॉन्सच्या बाजुस असलेल्या कै.शिवाजी धांडे नगर मधील रस्ता पक्का नसल्याने नागरीकांना वाहने चालविण्यास मुश्कील होते. पावसाळ्यात तर रस्त्यावर चिखलच चिखल दिसून येतो. रस्त्याच्या दुरूस्तीसाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र याची दखल नगर पालिका प्रशासनाने घेतली नाही. रात्री अवकाळी पाऊस झाल्याने या पावसामुळे रस्त्यावर पाणी जमा झाल्याने रस्ता चिखलमय झाला. वाहन धारकांना आपली वाहने हातात घेवून चालावी लागली. पायी चालणे रस्त्यावरुन कठीण झाले. नगर पालिका प्रशासनाने आतातरी रस्ता दुरूस्त करण्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी या भागातील नागरीकांकडून केली जात आहे.