बीड (रिपोर्टर) गेल्या पाच दिवसापासून बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात धुवाधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे खरिप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने सरसकट शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी व विम्याचा लाभ मिळावा या मागण्यासाठी आज किसान सभेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी अनेक शेतकर्यांचा सहभाग होता. आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
बीड जिल्ह्यात कापूस,सोयाबीन या दोन पिकाची सर्वाधिक लागवड झाली. मात्र परतीच्या पावसाने पिकाचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन, कापूस हि प्रमुख पिके पाण्यात गेली. शासनाने पंचनामे न करता थेट शेतकर्यांना आर्थिक मदत द्यावी. त्याचबरोबर विमा कंपन्याने विम्याचा लाभ द्यावा या प्रमुख मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसान सभेच्यावतीने तिव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्य सरकारचा जाहिर निषेध करण्यात आला. आंदोलनामध्ये अनेक शेतकर्यांचा सहभाग होता. आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.