बीड (रिपोर्टर) तुम्ही नेकनूरच्या व्यापार्यास गुजरातच्या व्यापार्याचा मोबाईल नंबर का दिला? अशी कुरापत काढून येळंबघाटमध्ये तलवारीने एकावर वार केल्याची घटना काल घडली. या प्रकरणी नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसीम मन्सूर शेख (वय ३०, रा. येळंबघाट) यांनी नेकनूर पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नदीम सालार शेख, अजीम सालार शेख, सालार हसन शेख, अफसर हसन शेख (सर्व रा. येळंबघाट) यांनी संगनमत करून मला व माझ्या वडिलाला तुम्ही नेकनूरच्या व्यापार्यास गुजरातच्या व्यापार्याला मोबाईल नंबर का दिला? अशी कुरापत काढून नदीम सालार शेख याने डोक्यात तलवार मारून गंभीर जखमी केले व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी वरील चौघा जणांविरोधात नेकनूर पोलिसात कलम ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४ भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.