Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeकोरोनाअँन्टीजेन टेस्टकडे केजच्या व्यापार्‍यांनी फिरवली पाठ

अँन्टीजेन टेस्टकडे केजच्या व्यापार्‍यांनी फिरवली पाठ

नियमाचे पालन न केल्यास कारवाई करणार
-तहसिलदार मेंढके

केज (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यासह मराठवाडयामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने याचा फैलाव जास्त होवू नये यासाठी शासनाने नियमावली ठरवून दिलेल्या आहे. त्या नियमावलीचे पालन न करणार्‍या विरोधात कारवाई केली जात आहे. शहरातील सर्व व्यापार्‍यांची ऍन्टीजेन टेस्ट करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला. मात्र याकडे व्यापार्‍यांनी पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या बाबतीत नियमाचे पालन न करणार्‍या विरोधात कारवाई केली जाईल असा इशारा तहसिलदार दुलाजी मेंढके यांनी दिला आहे.
केजमध्ये एक महिनाभर शहरासह ग्रामीण भागातील व्यापार्‍यांची ऍन्टीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. टेस्ट करण्यात आल्यानंतर व्यायसायीकांनी आपले दुकान सुरू करावे अशा सुचना आरोग्य प्रशासनाने दिलेल्या आहे. त्यानुसार कालपासून ऍन्टीजेन टेस्टला सुरूवात झाली. मात्र याकडे व्यापाार्‍यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. ऍन्टीजेन टेस्ट करणे सक्तीचे असून त्याचे पालन न करणार्‍या विरोधात कारवाई करण्यात येईल असा इशारा तहसिलदार दुलाजी मेंढके यांनी दिला आहे. दरम्यान नागरीकांनी प्रवास करतांना मास्कचा वापर करावा असे आवाहनही प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.
क्लासेस सुरूच
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता राज्याच्या शिक्षण विभागाने दहा मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. लग्न इतर समारंभ याला काही नियमावली ठरवून दिल्या. क्लासेसलाही नियमाचे बंधन आहे. मात्र शहरात सर्रासपणे क्लासेस सुरू असून याकडे प्रशासन का दुर्लक्ष करत आहे असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!