Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeक्राईमलग्नाचे अमिष दाखवून विवाहित महिलेवर बलात्कार

लग्नाचे अमिष दाखवून विवाहित महिलेवर बलात्कार

बीड (रिपोर्टर):- शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका २४ वर्षीय विवाहित महिलेला लग्नाचे अमिष दाखवून गेल्या दहा महिन्यापासून तिच्यावर सतत अत्याचार केल्याची तक्रार स्वत: तिने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठुन दिली आहे. या प्रकरणी आरेापी विरोधी ३७६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील शाहुनगर येथील २४ वर्षीय विवाहित महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एकाने मला लग्नाचे अमिष दाखवून माझ्यावर सतत गेल्या दहा महिन्यापासून अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीसांनी ३७६ नुसार गुन्हा दाखल करून घेतला असून पुढील तपास पीएसआय मीना तुपे या करत आहेत. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहे.

Most Popular

error: Content is protected !!