माजलगाव (रिपोर्टर) शहरातील नवनाथ नगर भागातील रहिवाशी असलेले रामदास क्षीरसागर यांचा मुलगा श्रावण यास डोक्यात ताप गेल्याने झालेल्या मेंदुच्या आजाराच्या उपचारासाठी बाळासाहेब शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या विनंतीवरून महाराष्ट् राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ दोन लाख रूपयांचा निधी मंजूर करून मदतीचा हात दिला असुन श्रावणची प्रकृती ठणठणीत झाली आहे.
शहरातील नवनाथ नगर भागातील रहिवाशी असलेले रामदास क्षीरसागर हे हॉटेल व्यावसाय करतात त्यांचा मुलगा श्रावण क्षीरसागर वय ०६ वर्षे याला एक महिण्यापूर्वी डोक्यामध्ये ताप गेल्यामुळे मेंदूचा आजार झाला आहे. सदर बालकावर औरंगाबाद येथे संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत परंतु घरची परिस्थिती हालाखीची असल्याने मोठी आर्थिक अडचणत रामदास यांचेसमोर होती. हॉटेलमधुन जेमतेम मिळणा-या पैशातुन कुटूंबाची गुजराण करणा-या क्षीरसागर कुटूंबीयांकडे या आजारावरील उपचारासाठी पैशांची गरज होती. यावर त्यांच्या प्रभागातील तरूण पप्पू डुकरे, सुधिर कुलकर्णी यांनी बाळासाहेब शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन मुंदडा यांचेशी सपर्ंक साधला आणि बाळासाहेब शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क करून सर्व प्रकार सांगीतला. यावर जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी सामाजिक भावनेतून उपचारासाठी थेट मुख्यमंञ्यानच्या कानी सर्व माहीती दिली …आजारी मुला प्रती संवेदनशीलता दाखवत मुख्यमंत्री कार्यालयातून संबंधित यंञनेस आदेशीत करुन श्रावण क्षीरसागर या सहा वर्षीय बालकाच्या उपचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ दोन लाख रूपयांचा निधी मंजूर करत मदतीचा हात दिला. दरम्यान या मदतीमुळे सदरील मुलावर यशस्वी उपचार झाले असुन औरंगाबाद येथे श्रावण वर उपचार सुरू आहेत.