Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeबीडचव्हाणवाडीत अनेकांना थंडी-तापीची लागण आरोग्य विभागाने गावात येऊन तपासणी करावी

चव्हाणवाडीत अनेकांना थंडी-तापीची लागण आरोग्य विभागाने गावात येऊन तपासणी करावी


कुक्कडगाव (रिपोर्टर)- कोरोनाचा संसर्ग सुरू असताना इतरही आजारांमुळे नागरिक त्रस्त आहेत. बीडपासून काही अंंतरावर असलेल्या चव्हाणवाडी येथील जवळपास अर्ध्या गावाला थंडी-ताप येत असल्याने गावकर्‍यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांनी गावात येऊन नागरिकांची तपासणी करावी, अशी मागणी गावकर्‍यांनी केली आहे.


   गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. जिल्हाभरात दररोज जवळपास 50 नवीन रुग्ण निघत आहेत. कोरोनाचा संसर्ग सुरू असतानाच इतर आजारामुळे नागरिक त्रस्त होऊ लागले आहेत. थंडी-तापीचीही साथ सुरू आहे. बीडपासून काही अंतरावर असलेल्या चव्हाणवाडी येथे अनेक गावकर्‍यांना थंडी तापीची लागण झाल्याने गावकर्‍यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी गावात एका वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे गावकर्‍यात अधिकच भीती निर्माण झाली. काही नागरिकांनी घराबाहेर निघणे बंद केले आहे. ग्रामीण आरोग्य विभागाने याची दखल घेऊन गावात जावून नागरिकांची आरोग्य तपासणी करावी, अशी मागणी गावकर्‍यांकडून करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!