भाई थावरेंच्या नेतृत्वाखाली गावपातळीवर आंदोलन; नुकसान भरपाई तात्काळ देण्याची मागणी
बीड (रिपोर्टर) परतीच्या पावसाने जिल्हाभरातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याचं कुठलंही गांभीर्य राज्य सरकारला नाही. शासनाने अद्याप मदत जाहीर केली नसून काल पाडव्या दिवशी भाई गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली माजलगाव, केज, धारूर या तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींवर रुमणे मोर्चे काढण्यात आले होते.
दहा दिवसांपूर्वी पडलेल्या परतीच्या पावसाने कापूस, सोयाबीनसह इतर खरीप पिकांचे मोठे नुकसान केले होते. शासनाने दिवाळीत शेतकर्यांना वार्यावर सोडून कुठलीही मदत जाहीर केली नाही. पाडव्या दिवशी राज्य सरकारच्या निषेधार्थ माजलगाव तालुक्यातील खतगव्हाण, उपळी, आनंदगाव, शिंपेटाकळी, भाटवडगाव, गेवराई तालुक्यातील उमापूर, निपाणी टाकळी, केज तालुक्यातील वरपगाव, धारूर तालुक्यातील कारी या सह आदी ग्रामपंचायतींवर रुमणे मोर्चे काढण्यात आले. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्यांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकर्यांच्या वतीने करण्यात आली.