डोपोटेशनवरचे जिथली तिथे मुख्यालयी राहण्याचे सक्त आदेश
बीड (रिपोर्टर) शिस्तप्रिय आयुक्त तुकाराम मुंडे यांनी जिल्हा रूग्णालयात भेट देवून पाहणी केल्यानंतर आढळलेल्या अनेक कर्मचार्यांच्या कामातील कुचराया, रूग्णसेवेबाबत दुर्लक्ष, आपल्या सोयीनुसार ड्युटी, मनमानीपणा याची अखेर साफसफाई सुरू झाली आहे. आपल्या सोयीनुसार डेपोटेशनवर आलेल्या डॉक्टर कर्मचार्यांना त्यांच्या मुळ नियुक्तीच्याठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे आदेश देण्यात आले असून डॉक्टरांसह कर्मचार्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश सक्तीने देण्यात आल्याचेही कळते.
दोन दिवसापूर्वी राज्याचे आरोग्यआयुक्त तुकाराम मुंढे बीड जिल्हा दौर्यावर आले होते. त्यांनी जिल्हा रूग्णालयाची पाहणी करत तेथील संपूर्ण परिस्थिती जाणून घेतली होती. ज्या काही त्रुटी होत्या त्याबाबत निर्देश त्यांनी जिल्हाशल्यचिकित्सकांना दिले होते. काही डॉक्टर आणि कर्मचारी सोयीनुसार जिल्हा रूग्णालयात ठाण मांडून होते. डेपोटेशनवर आलेल्या आरोग्य कर्मचार्यांना मुळ नियुक्तीच्या ठिकाणी पाठवण्याचे निर्देश मुंढे यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा रूग्णालयातील तीन डॉक्टरांना त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणी पाठवण्यात आले. यामध्ये डॉ.स्नेहल मेंगडे, डॉ.मनिषा मुंडे, डॉ.फातेमा यांचा समावेश आहे. मेंगडे या केज, मुंढे तेलगाव आणि फातेमा अंबाजोगाई याठिकाणी कार्यरत होते. या तीनही डॉक्टरांना मुळ जागेवर काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.